- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गोंदिया :-ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गोंदियात भाजपला मोठा धक्का बसला आहे.गोंदिया विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे.ते १३ सप्टेंबरला गोंदियात वरिष्ठ काँग्रेस नेत्याच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहे.अशी माहिती त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत, दिली आहे.
गोपालदास अग्रवाल हे ५ वेळा गोंदिया विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले आहेत.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भारतीय जनता पक्षात तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित प्रवेश केला.
पुढे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या कमळ चिन्हावर गोंदिया विधानसभेची निवडणूक लढविली होती.मात्र,त्यांना पराभव पत्करावा लागला होता.आज,पत्रकार परिषदेत बोलताना गोपालदास अग्रवाल म्हणाले की, “गेल्या पाच वर्षात भारतीय जनता पक्षात राहिलो.पक्ष सत्तेत सहभागी असताना सुद्धा हव्या त्या प्रमाणात गोंदिया विधानसभेचा विकास न करता आल्याने आगामी विधानसभा निवडणूक पाहता काँग्रेस पक्षात घर वापसी करत आहे.”
दरम्यान,गोपालदास अग्रवाल हे काँग्रेसमध्ये प्रवेश करत असल्याने गोंदिया जिल्यातील काँग्रेस पक्षाचे एकमेव आमदार सहसराम कोरोटे,जिल्हा अध्यक्ष दिलीप बनसोड आणि इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले.येत्या १३ सप्टेंबरला गोंदियात आयोजित काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमात माजी आमदार गोपालदास अग्रवाल हे घर वापसी करणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
- Advertisement -

