- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-अतिदुर्गम,आदिवासीबहुल गडचिरोली
जिल्ह्यातील आरोग्य समस्यांवर शास्त्रीय पद्धतीने संशोधन करतानाच येथील बालमृत्यूच्या समस्येसह आरोग्याच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी कायम झटत आलेले ज्येष्ठ समाजसेवक डॉ.अभय बंग व डॉ. राणी बंग सिनेजगताचा महानायक अमिताभ बच्चन यांच्या बहारदार संचालनाने सजलेल्या कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात येत्या शुक्रवार दिनांक- १३ सप्टेंबर रोजी दिसणार आहेत.
सोनी वाहिनीवर अमिताभ बच्चन संचालन करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाचे नाव प्रत्येकाच्याच तोंडी असते.अतिशय विनम्र पण खुमासदार पद्धतीने प्रश्न विचारणारे अमिताभ बच्चन आणि प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासोबत वाढत जाणारे पैशांचे आकडे यातून हा कार्यक्रम रंगत जातो.आता या कार्यक्रमाची रंगत वाढविण्यासह आपल्या दीर्घकालीन समाजसेवेचा प्रवास उलगडण्यासाठी बंग दाम्पत्याला या कार्यक्रमात आमंत्रित करण्यात आले आहे.विशेष म्हणजे या खेळात जिंकलेली रक्कम बंग दाम्पत्य राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वर्धा येथील सेवाग्राम आश्रमाला देणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यातून ‘कौन बनेगा करोडपती’ सारख्या लोकप्रिय कार्यक्रमात सहभागी होणारे डॉ.अभय बंग व राणी बंग द्वितीय दाम्पत्य आहेत.यापूर्वी या कार्यक्रमात ज्येष्ठ समाजसेवक डॉ.प्रकाश आमटे व डॉ.मंदाकिनी आमटे सहभागी झाले होते.
- Advertisement -

