Monday, July 13, 2026
Homeनागपूरनदीत पोहायला गेले अन् जीव गमावून बसले.. - १३ वर्षीय विध्यार्थ्यांचा बुडून...

नदीत पोहायला गेले अन् जीव गमावून बसले.. – १३ वर्षीय विध्यार्थ्यांचा बुडून मृत्यू…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-रामटेक तालुक्यातील महादुला येथे पोहण्याच्या नादात पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल,शनिवारी ७ सप्टेंबरला ११ वाजताच्या सुमारास घडली.
प्राप्त माहितीनुसार,रामटेक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील महादुला येथील वृषभ राजेंद्र गाडगे व रोहन सुभाष साऊसाखडे वय १३ वर्षे,हे दोघेही श्री संत ज्ञानेश्वर महाराज विद्यालय, महादुला येथे आठवीमध्ये शिक्षण घेत होते.शाळेला सुट्टी असल्याने गावाजवळील नदीत त्यांना पोहण्याचा मोह आवरता आला नाही.११ वाजताच्या सुमारास दोघेही नदीत उतरले.दोघांपैकी एकाला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात गटांगळ्या खाऊ लागला.त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात दुसराही बुडाला.गावातील पोहणाऱ्यांच्या मदतीने दोन्ही मुलांना शोधण्याचा प्रयत्न केला; मात्र ते अपयशी ठरले.घटनेची माहिती सरपंच शरद डडुरे यांना मिळताच त्यांनी आमदार आशिष जयस्वाल यांना कळविले.त्यांनी तात्काळ एसडीआरएफ पथक घटनास्थळी पाठवले.पथकाने दोन बोटींच्या मदतीने शोधमोहीम सुरू केली.शोध मोहिमेत दोघांचेही मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

केंद्रीय विद्यालयात इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्रवेशासाठी अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गडचिरोली येथे नव्याने सुरू झालेल्या केंद्रीय विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी इयत्ता १ ली ते ५ वी मधील रिक्त जागांसाठी प्रवेश...

आता मार्केटमध्ये येणार दहा किलो वजनाचा गॅस सिलेंडर..

उद्रेक न्युज वृत्त:-बऱ्याच ठिकाणी जागेचा अभाव, वजनी सिलेंडर तसेच वजनानुसार वाढणारी रक्कम सर्वसामान्यांना न झेपावणारी असते.विशेषतः लहान व्यावसायिक,हॉटेल चालक आणि रस्त्यावरील विक्रेते. यासाठी सरकारी...

वाघ दिसताच पळत सुटले; जीव वाचवण्यासाठी धावत असतांनाच बंधाऱ्यात पडले,बाप-लेकाचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या रामटेक तालुक्यातून एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे.शेतावर गेलेले तिघेजण वाघ दिसताच जिकडे बनेल तिकडे धावत-पळत सुटले.पण जीव वाचवण्यासाठी बंधाऱ्यावरून...

पालकमंत्री साहेब..मक्याचे करायचे काय? पोळी खायला गहू द्या न..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात जुलै महिन्यापासून शासकीय स्वस्त धान्य दुकानांतून लाभार्थ्यांना मक्याचे वितरण केले जात आहे.दर महिन्याला तांदळासोबत १० ते १५ किलो मिळणारा गहू...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!