- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-माहे सप्टेंबर महिन्यातील लोकशाही दिनाचे आयोजन येत्या सोमवार,दिनांक- २ सप्टेंबर म्हणजेच बैल पोळ्याच्या दिवशी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात करण्यात आले आहे.
लोकशाही दिनी तक्रार अर्ज स्विकारण्याची वेळ दुपारी २ ते ३ वाजेपर्यंत राहील आणि सभेला ३ वाजता सुरुवात होणार असून ज्या तक्रारदारांना लोकशाही दिनात तक्रार अर्ज दाखल करावयाचा असल्यास, त्यांनी तालुका स्तरावरील लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारीचे निराकरण होवून प्राप्त झालेल्या अहवालावर समाधान न झाल्यास तालुका स्तरावरील प्राप्त अहवाल व टोकन क्रमांक जोडून जिल्हास्तरावर दिनांक- २ सप्टेंबर २०२४ रोजी होणाऱ्या लोकशाही दिनात तक्रार अर्ज विहित नमुन्यात (प्रपत्र-१ अ ते १ ड) दोन प्रतित दाखल करणे आवश्यक राहील.तसेच तक्रार,निवेदन वैयक्तिक स्वरुपाची असावी; अन्यथा अर्ज विचारात घेण्यात येणार नाही; असे निवासी उपजिल्हाधिकारी गडचिरोली यांनी कळविले आहे.
- Advertisement -

