Friday, May 22, 2026
Homeचंद्रपूरशासकीय कामांत अनियमितता; शिक्षणाधिकारी निलंबित...

शासकीय कामांत अनियमितता; शिक्षणाधिकारी निलंबित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्हा परिषदेच्या तत्कालीन शिक्षणाधिकारी (माध्यमिक)कल्पना चव्हाण यांच्यावर शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे सहसचिव टी.वाय. करपते यांनी निलंबनाची कारवाई केली.सदरच्या कारवाईने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.चव्हाण ह्या सध्या जळगावच्या जिल्हा परिषदेमध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी पदावर कार्यरत आहेत.
चंद्रपूरच्या माध्यमिक शिक्षण विभागात कल्पना चव्हाण या तीन वर्षांपूर्वी रुजू झाल्या होत्या.त्यांच्या कार्यकाळात शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित ठेवली जात होती.महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदे संघटनेला कर्मचाऱ्यांच्या बऱ्याच तक्रारी सतत प्राप्त होत होत्या.शासकीय कामांत अनियमितता करणे,यासह त्यांच्यावर गंभीर आरोप होते.विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने आमदार सुधाकर अडबाले यांनी त्यांच्याविरुद्ध अनेकदा आंदोलने केली. अखेर शिक्षण उपसंचालक नागपूर यांच्या तपासणी पथकाने शिक्षणाधिकारी (माध्यमिक) कार्यालयाची चौकशी केली.
त्यात त्या दोषी आढळून आल्या.चव्हाण यांना महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९च्या नियम १० अन्वये आयुक्त (शिक्षण) पुणे यांनी दोषी ठरविले होते.मात्र,निलंबनाची कारवाई झाली नव्हती.याबाबत आमदार अडबाले यांनी ५ जुलै २०२४ रोजी अधिवेशनात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. चव्हाण यांना कारणे द्या नोटीस बजावण्यात आले. नोटीसला उत्तर मिळाल्यानंतर निलंबित करण्याचा निर्णय सोमवारी २६ ऑगस्ट रोजी घेण्यात आला.
निलंबन काळात खासगी नोकरी अथवा व्यवसाय केल्यास त्या गैरवर्तणुकीबाबत दोषी ठरतील व कारवाईस पात्र ठरून निर्वाह भत्त्यावरील हक्क गमावून बसतील,असेही निलंबन आदेशात नमूद केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल ४३४ रिक्त पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन.. – पदांनुसार मासिक वेतन मिळणार १६ हजार रुपयांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच उद्योगांना कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास,रोजगार व उद्योजकता...

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बालकांना मिळणार राष्ट्रीय स्तरावरील गौरव.. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत सन-२०२७ साठी दिल्या जाणाऱ्या ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’साठी अर्ज मागविण्यात आले आहेत.शिक्षण,कला,सांस्कृतिक कार्य,क्रीडा, नाविन्यपूर्ण शोध,सामाजिक...

अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-जिल्ह्याच्या नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर आज,शुक्रवार २२ एप्रिल रोजी भीषण अपघाताची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस आली.विरूध्द दिशेने भरधाव वेगात असलेल्या एका अज्ञात...

प्रलंबित बिल आणि नवीन काम देण्यासाठी दोन टक्के दराने मागितले ७० हजार.. -जलसंपदा विभागातील अधीक्षक अभियंता एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कामाचे प्रलंबित असलेले बिल काढून देण्यासाठी व नवीन काही कामे तुम्हालाच देणार म्हणून दोन टक्के प्रमाणे ७० हजाराची लाचेची मागणी करणाऱ्या जलसंपदा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!