- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :-शिक्षण पूर्ण करुन नोकरीसाठी अनुभवाच्या शोधात असलेल्या युवा वर्गाला विद्यावेतनासह शिक्षणाच्या बळावर अनुभवाची जोड देता यावी; या उद्देशाने राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली आहे.या योजनेंतर्गत युवकांना विद्यावेतनासह नोकरीचा अनुभव मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाली असून बारावी पास,आयटीआय,पदविका आणि पदविधर किंवा पदव्युत्तर युवकांनी या योजनेच्या लाभासाठी पुढे यावेत तसेच ज्येष्ठ नागरिकांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ्य अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने त्यांना वयोमानपरत्वे भेडसावणाऱ्या आरोग्यविषयक विविध समस्यांवर मात करुन त्यांचे जीवनमान सुखकर करण्याकरिता राज्यातील ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ सुरू करण्यात आली असल्याने या दोन्ही योजनांचा तसेच इतर योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन ‘मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना’ तसेच ‘वयोश्री’ योजनेच्या गडचिरोली तालुक्याच्या गिलगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या आवारात २६ ऑगस्ट रोजी झालेल्या भव्य-दिव्य कार्यक्रमाच्या आयोजन प्रसंगी कार्यक्रमाचे आयोजक मेघाताई कोसरे शिवसेना(शिंदे गट)महिला तालुका प्रमुख धानोरा यांनी केले आहे.
कार्यक्रम प्रसंगी सर्वप्रथम जिल्हा परिषद शाळा गिलगाव येथील विद्यार्थ्यांना राखी बांधतात आली.त्यानंतर वयोवृद्धांना ‘वयोश्री’ योजनेचे महत्त्व पटवून देत फार्म भरण्यात आले तसेच ‘मुख्यमंत्री-माझा लाडका भाऊ’ योजनेचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघता,त्यांचेही फार्म भरण्यात आले.यावेळी योजनेचे लाभार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रमास श्रीदेवी वरगंटीवार शिवसेना महिला जिल्हा प्रमुख गडचिरोली विधानसभा,संगिता हर्षे शिवसेना गडचिरोली महिला उपजिल्हा प्रमुख यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रसंगी गिलगाव येथील महिला शिवसैनिक आणि योजनेचे लाभार्थी बहुसंख्येने उपस्थित होते..
- Advertisement -

