Friday, May 1, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तअन्यथा भारतात 'टेलीग्राम' वर येणार बंदी... -भारत सरकार टेलिग्रामच्या विरोधात ॲक्शन मोडमध्ये...

अन्यथा भारतात ‘टेलीग्राम’ वर येणार बंदी… -भारत सरकार टेलिग्रामच्या विरोधात ॲक्शन मोडमध्ये…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मॅसेजिंग ॲप टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांच्या अटकेनंतर भारत सरकारही चौकशी सुरू करणार आहे.सरकारला हे जाणून घ्यायचे आहे की,हे ॲप गुन्हेगारी कृत्यांमध्ये वापरले जात आहे की नाही,ज्यामध्ये खंडणी आणि जुगार इत्यादींचा समावेश आहे.मीडिया रिपोर्ट्समधून ही माहिती समोर आली आहे.हे ॲप तपासात दोषी आढळल्यास त्याच्यावर बंदीची कारवाई केली जाऊ शकते; असा दावा अहवालात करण्यात आला आहे.
अलीकडेच,फ्रान्स पोलिसांनी टेलिग्रामचे सीईओ पावेल दुरोव यांना अटक केली.फ्रेंच सरकारने रशियन वंशाच्या दुरोववर अनेक गंभीर आरोप केले आहेत; जे सिद्ध झाल्यास २० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.भारत सरकारही टेलिग्रामच्या विरोधात ॲक्शन मोडमध्ये आले आहे.केंद्र सरकार दुरोवच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कारवाई करण्याच्या तयारीत आहे.कारवाईदरम्यान सरकारला योग्य वाटल्यास टेलिग्राम ॲपवर भारतातही बंदी घालण्यात येईल.
आयटी मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, गृह मंत्रालय विविध बेकायदेशीर कामांबाबत टेलिग्रामवर लक्ष ठेवून आहे.मनी लाँड्रिंग,ड्रग तस्करी आणि पेडोफिलिक सामग्रीचे सामायिकरण अशा बेकायदेशीर कामांच्या तपासाचा समावेश आहे. माहिती आणि तंत्रज्ञान (IT) मंत्रालय लवकरच टेलीग्रामद्वारे होत असलेल्या विविध बेकायदेशीर क्रियाकलापांवर आपल्या शिफारशी गृह मंत्रालयाला पाठवणार आहे.असे वृत पुढारीने दिले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!