Saturday, June 20, 2026
Homeगडचिरोलीयेत्या २८ ऑगस्टपासून होमगार्ड उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व शारिरीक चाचणी ... -...

येत्या २८ ऑगस्टपासून होमगार्ड उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व शारिरीक चाचणी … – उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडु नये..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्हा होमगार्डतर्फे होमगार्ड सदस्य नोंदणीसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणी व शारिरीक चाचणीसाठी २८ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर २०२४ पर्यंत सकाळी ४.३० ते ११ वाजेच्या  कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय गडचिरोली येथे बोलाविण्यात आले आहे.
जिल्ह्यातील गडचिरोली,आरमोरी,देसाईगंज,चामोर्शी, अहेरी,सिरोंचा या पथकातील पुरुष व महिला उमेदवारांचा अनुशेष भरुन काढण्यासाठी नविन होमगार्ड सदस्य नोंदणी करिता https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php  या संकेतस्थळावर १४ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज मागविण्यात आले होते.
कागदपत्र पडताळणी व शारीरिक चाचणी करीता येतांना ज्यांनी अर्ज जमा केला नाही; त्यांनी सोबत अर्ज आणावा.एन.सी.सी.बी. व सी.प्रमाणपत्र, आय.टी.आय.प्रमाणपत्र,जिल्हा स्तरीय क्रीडा प्राविण्य प्राप्त,जडवाहन चालक परवाना व इतर तपशिलाच्या सर्व संबंधित मुळ प्रमाणपत्र व दोन पासपोर्ट फोटो नोंदणीचे वेळी सादर करायचे आहेत.
उमेदवारांने शारिरीक क्षमता चाचणी मध्ये पात्र होणे करिता ४० टक्के गुण मिळविणे आवश्यक राहील (धावणे या प्रकारात किमान १० गुण व गोळाफेक या प्रकारात किमान ४ गुण आवश्यक राहील).होमगर्ड नोंदणी प्रक्रिया पारदर्शक राहणार असुन उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी पडु नये तसेच शिफारस/वशिला इ.गैरमार्गाचा वापर करु नये; होमगार्ड नोंदणी करिता कोणी पैसे/लाचेची मागणी केल्यास तात्काळ अपर पोलीस अधिक्षक गडचिरोली व अधिक्षक,लाच लुचपत प्रतिबंधक कार्यालय गडचिरोली यांचेकडे तक्रार करावी.अतिवृष्टीमुळे वेळापत्रकात बदल झाल्यास त्याची सुचना https://maharashtracdhg.gov.in/mahahg/login1.php  या संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येईल.त्यामुळे उमेदवारांनी सदर संकेतस्थळावरील सुचनांचे अवलोकन करावे; असे जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अप्पर पोलीस अधिक्षक एम.रमेश यांनी कळविले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!