- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
नागपूर :-डागा स्मृती शासकीय महिला रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर चौथ्या दिवशीच आई-वडिलांनी १ लाख १० हजारात आपल्या नवजात बाळाची विक्री करण्याची घटना कळमना परिसरात उघडकीस आली.या प्रकरणी कळमना पोलिसांनी आई-वडिलांसह दोन नातेवाइकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या मानवी तस्करीविरोधी पथकाला बाळाची खरेदी-विक्री होत असल्याची माहिती मिळताच त्यांनी सापळा रचला.प्रकरणी सहा आरोपींना अटक केली. पालकांनी बाळाची विक्री मुंबईत राहणाऱ्या दाम्पत्याला केली.या दाम्पत्याचे नातेवाईक नागपुरात राहतात.मुंबईतील या दाम्पत्याला लग्नानंतर मूल झाले नाही.मूल दत्तक घेण्याची किंवा रुग्णालयातून बाळ मिळाल्यास त्यांचा सांभाळ करण्याची इच्छा त्यांनी नागपुरातील नातेवाइकांकडे व्यक्त केली होती.त्यांनी त्यांच्यासाठी बाळाची व्यवस्था करण्यास सुरुवात केली.डागा रुग्णालयात प्रसूतीसाठी आलेल्या दाम्पत्याशी व्यवहार केला आणि डिस्चार्ज होताच बाळाची खरेदी-विक्री झाली.
- Advertisement -

