Friday, September 25, 2026
Homeगडचिरोली'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' वितरणाच्या दुसरा टप्प्याचा लाभ मिळणार ३१ ऑगस्टला......

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ वितरणाच्या दुसरा टप्प्याचा लाभ मिळणार ३१ ऑगस्टला… – जमा झालेल्या रकमेतून बँकांनी रक्कम कपात केल्यास करा तक्रार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ३१ जुलै पर्यंत मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार १७ ऑगस्ट रोजी लाभ वितरण करण्यात आले आहे. ई-केवायसी (आधार सिडींग) अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा ३१ ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रीया तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख १७ हजार ३८८ अर्ज प्राप्त झाले असून १ लाख ५४ हजार ६३२ अर्ज मंजूर करून लाभ वितरणासाठी शासनाकडे पाठवण्यात आले आहे.तसेच नव्याने प्राप्त अर्जही शासनाकडे लवकरच पाठविण्यत येणार आहेत. पहिल्या टप्प्यातील १ लाख ३३ हजार महिलांना प्रत्येकी तीन हजार रुपये लाभ वितरीत करण्यात आला आहे.इ-केवायसी पूर्ण नसल्याने ज्या महिलांच्या खात्यात रक्कम अद्यापपर्यंत जमा झाली नाही त्या लाभार्थी महिलांनी इ-केवायसी पूर्ण केल्यावर त्यांच्या खात्यात रक्कम जमा होणार आहे.तरी इ-केवायसी प्रलंबित असलेल्या महिलांना शासनातर्फे मोबईल संदेश पाठविण्यात आला आहे; त्यांनी  तातडीने आपले खाते आधार सिडिंग करून ई-केवायसी पूर्ण करावी;  असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे.
बँकांनी रक्कम कपात करू नये👇
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अनुदान तात्काळ जमा होण्यासाठी सर्व बँकांनी त्यांच्याकडील लाभार्थ्यांचे खात्याची आधार सिडिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी.तसेच जमा होणाऱ्या अनुदानातून कुठल्याही प्रकारचे हप्ते थकीत रक्कम किंवा किमान शिल्लक च्या नावाखाली कुठल्याही प्रकारची रक्कम कपात न करता जमा झालेले संपूर्ण अनुदान लाभार्थ्यांना अदा करावे; असे निर्देश जिल्हाधिकारी संजय दैने यांनी बँकांना दिले आहे.याबाबत कुठलीही तक्रार प्राप्त झाल्यास संबंधित बँकेवर कारवाई करण्यात येईल; असा इशाराही जिल्हाधिकारी दैने यांनी बँकांना दिलेला आहे
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!