- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
मूल(चंद्रपूर) :-चिचपल्ली वनविभागाच्या मूल येथील कक्ष क्रमांक-७५२ मध्ये शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास सुमारास घडली.मुनीम रतीराम गोलावार वय ४१ वर्षे,रा. चिचाळा,असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळीपालकाचे नाव आहे.मुनीम यांचा शेळीपालनाचा व्यवसाय असल्याने ते नेहमीप्रमाणे शेळ्यांना चराईसाठी वनपरिक्षेत्र चिचपल्ली उपक्षेत्र मूल येथील कक्ष क्रमांक-७५२ मध्ये गेले होते.दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.मुनीम रात्री उशिरापर्यंत घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी वनविभागाला माहिती दिली.विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे यांच्या आदेशानुसार सोमवारी सकाळी मूलचे क्षेत्र सहाय्यक मस्के,जानाळाचे वनरक्षक राकेश गुरनुले, सुधीर ठाकूर,पवन येसांबरे,शीतल चौधरी,शुभांगी गुरनुले,चंद्रपूर येथील अतिशिघ्र कृती दलाचे कर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार,दिनेश खेवले,अंकुश वाणी,रीतेश पीजदूरकर,प्रतीक लेनगुरे,हौशीक मंगर,यांनी शोध मोहीम राबवली असता जंगलात मुनीमचा मृतदेह आढळून आला.यावेळी वनविभाग व पोलिस प्रशासनामार्फत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृताच्या पत्नीला चिचपल्ली वनविभागाच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे यांच्या हस्ते ५०
हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.यावेळी महादवाडीचे क्षेत्र सहाय्यक पी.डी.खनके,केळझरचे क्षेत्र सहाय्यक पी.डब्लू.पडवे,संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे,जानाळाचे वनरक्षक आर.जे.गुरनुले व मृताचे नातेवाईक उपस्थित होते.
- Advertisement -

