Saturday, September 26, 2026
Homeचंद्रपूरशेळ्या चारण्यासाठी गेला अन् वाघाच्या हल्ल्यात ठार झाला...

शेळ्या चारण्यासाठी गेला अन् वाघाच्या हल्ल्यात ठार झाला…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मूल(चंद्रपूर) :-चिचपल्ली वनविभागाच्या मूल येथील कक्ष क्रमांक-७५२ मध्ये शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर वाघाने हल्ला केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास सुमारास घडली.मुनीम रतीराम गोलावार वय ४१ वर्षे,रा. चिचाळा,असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या शेळीपालकाचे नाव आहे.मुनीम यांचा शेळीपालनाचा व्यवसाय असल्याने ते नेहमीप्रमाणे शेळ्यांना चराईसाठी वनपरिक्षेत्र चिचपल्ली उपक्षेत्र मूल येथील कक्ष क्रमांक-७५२ मध्ये गेले होते.दरम्यान दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर हल्ला केला.यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.मुनीम रात्री उशिरापर्यंत घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी वनविभागाला माहिती दिली.विभागीय वनाधिकारी प्रशांत खाडे, चिचपल्लीच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे यांच्या आदेशानुसार सोमवारी सकाळी मूलचे क्षेत्र सहाय्यक मस्के,जानाळाचे वनरक्षक राकेश गुरनुले, सुधीर ठाकूर,पवन येसांबरे,शीतल चौधरी,शुभांगी गुरनुले,चंद्रपूर येथील अतिशिघ्र कृती दलाचे कर्मचारी व संजीवन पर्यावरण संस्थेचे सदस्य प्रशांत मुत्यारपवार,दिनेश खेवले,अंकुश वाणी,रीतेश पीजदूरकर,प्रतीक लेनगुरे,हौशीक मंगर,यांनी शोध मोहीम राबवली असता जंगलात मुनीमचा मृतदेह आढळून आला.यावेळी वनविभाग व पोलिस प्रशासनामार्फत घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.
मृताच्या पत्नीला चिचपल्ली वनविभागाच्या वनपरिक्षेत्राधिकारी प्रियंका वेलमे यांच्या हस्ते ५०
हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.यावेळी महादवाडीचे क्षेत्र सहाय्यक पी.डी.खनके,केळझरचे क्षेत्र सहाय्यक पी.डब्लू.पडवे,संजीवन पर्यावरण संस्थेचे अध्यक्ष उमेशसिंह झिरे,जानाळाचे वनरक्षक आर.जे.गुरनुले व मृताचे नातेवाईक उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-‘दुष्काळी परिस्थितीत राज्यातील शेतकरी, शेतमजूर,कष्टकरी आमच्या मदतीच्या केंद्रस्थानी आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.आम्ही शेतकऱी बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे...

पोलीस दलात खळबळ; बेपत्ता पोलीस कर्मचाऱ्याचा सापडला मृतदेह..!

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-जिल्ह्याच्या पिंपरी-चिंचवड शहराच्या पोलीस दलात खळबळ उडवणारी घटना आज,शनिवार २६ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली. तब्बल तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या...

बस आणि कारची समोरासमोर धडक; बीसीएन न्यूजचे संपादक गंभीर जखमी.. -नागपूरला हलवले..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आणि कारची समोरासमोर धडक होऊन कारच्या समोरील भागाचा अक्षरशः चुराडा झाला.झालेल्या अपघातात कारमधील बीसीएन न्यूजचे संपादक...

राज्यातील ३५८ पैकी २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर.. -पहा संपूर्ण तालुक्यांची यादी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-यंदाच्या एलनिनोच्या प्रभावामुळे राज्याच्या विविध भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवलेली आहे. राज्यातील विविध तालुक्यांमध्ये जून ते आजपर्यंतच्या कालावधीतील पर्जन्याची तूट व अन्य...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!