- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
ब्रम्हपुरी(चंद्रपूर) :- ब्रम्हपुरी तालुक्याच्या अड्याळ जाणी येथे विपश्यना केंद्राचे भूमीपूजन तसेच तथागत गौतम बुद्धांच्या मूर्तीचे वितरण आज,रविवारी १८ ऑगस्टला दुपारी १२ वाजता करण्यात येणार आहे.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून थायलंड येथील वाट साकेत धम्म स्कूल रॉयल मठ पाली विभागाचे प्राध्यापक डॉ. फ्रामहा फॉगसाथोर्न धम्मभणी,पाली विभागाचे फ्रामाहा सुपाचै सुयानो यांची उपस्थिती राहणार आहे. मुख्य अतिथी म्हणून खा.वर्षा गायकवाड,खा.प्रणिती शिंदे,खा.बलवंत वानखेडे,खा.नामदेव किरसान,खा. शिवाजीराव काळगे,आ.विजय वडेट्टीवार खा.श्याम बर्वे,कॅप्टन नटिकेट थाईलंड,सिनेअभिनेता गगन मलिक,अनुसूचित जाती सेलचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ अंबीरे यांची उपस्थिती राहणार आहे.सकाळी १० ते १२ या वेळात सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध वनकर यांचा बुध्द-भीमगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तरी या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे; असे आवाहन तालुका काँग्रेस कमिटीने केले आहे.
- Advertisement -

