Wednesday, September 30, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न...

देसाईगंज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक संपन्न…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली) :-येत्या विधानसभा निवडणुकी दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची(शरदचंद्र पवार गट)भूमिका,पक्ष वाढ,सर्वसामान्य जनतेची कामे,विविध सेल मधील पदाधिकाऱ्यांची निवड व इतर बाबींवर आज,१६ ऑगस्टला दुपारच्या सुमारास देसाईगंज येथील विश्रामगृहात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत आढावा बैठक पार पडली.
बैठकीपूर्वी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर.आर.पाटील यांची जयंती साजरी करण्यात आली.राकाँपाचे(शरदचंद्र पवार गट)देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते आर.आर.पाटील यांच्या जीवनपटलावर प्रकाश टाकत आढावा बैठक सुरू करण्यात आली.बैठकीत ज्यांचे पक्षचिन्ह व ज्यासाठी जीवाचे रान करून ज्यांनी पक्ष वाढीचे काम केलेत; अशांना विसरून पक्ष फुटीचे राजकारण करणाऱ्यांना धडा शिकविण्याचे काम जनताच करीत आहे.चिन्ह बदलले तरीही राज्याच्या लोकसभा निवडणुकीत १० पैकी ८ खासदार निवडून आले असल्याने जनतेचा कौल आणि शरदचंद्र पवार यांच्याशी जनतेची नाळ जुळल्या गेलेली आहे; असे मत बैठकी प्रसंगी व्यक्त करण्यात आले.सभेमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी पुर्ण ताकतीने उतरावे असे सर्वानुमते ठरविण्यात आले.
बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे(शरद पवार गट) महाराष्ट्र प्रदेश सचिव ओमप्रकाश शर्मा,देसाईगंज तालुकाध्यक्ष क्षितिज उके,शहराध्यक्ष अशोक माडावार,आरमोरी विधानसभा निरीक्षक खेमराज परशुरामकर,ओ.बी.सी.सेलचे तालुकाध्यक्ष वसंतराव गोंगल,अल्पसंख्यांकचे तालुकाध्यक्ष सहाबुद्दीन पठाण, तालुका उपाध्यक्ष रोशन शेंडे,विलासराव पुस्तोडे,डाकराम वाघमारे,हंसराज लांडगे,बुद्धघोष मेश्राम,शरद राऊत,अरुण मेश्राम,दीपक सहारे,प्रदीप बगमारे, हरिदास बगमारे,आशिष गेडाम, माजी तंटामुक्ती अध्यक्ष तुलाराम राखडे,शुभम मेश्राम, भास्कर वाटकर,नामदेव मेश्राम,अविनाश राघोर्ते,हितेंद्र गजघाटे,पुष्पाताई सुरकार,कल्पना वासनिक,संगीता भानारकर,निराशा गेडाम,ताईरा बेगम पठाण व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर जिल्हा व स्थानिक प्रशासनाच्या सजगतेने प्रलयकारी पुरावर मात..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-२५ ते २८ सप्टेंबर दरम्यान इंद्रावती उपखोऱ्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराला गेले चार दिवस भीषण पुराचा वेढा पडला...

मंत्रिमंडळ बैठकीतील दहा मोठे निर्णय; माजी अग्निवीरांसाठी शासकीय नोकरीत आरक्षण..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य मंत्री मंडळाची बैठक आज,मंगळवार २९ सप्टेंबर रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडलेल्या...

कुष्ठांतेयांची तालुका स्तरावर ११ सदस्यीय कार्यकारिणी गठित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र,भिसी येथे सक्षम कुष्ठांतेय स्वाभिमानी संस्थेच्या माध्यमातून २८ सप्टेंबर रोजी कुष्ठांतेयांची सभा आयोजित करण्यात आली.वैद्यकीय अधिकारी...

सावधान..! वनविभागातील नोकरीचे आमिष पडू शकते महागात.. – वनरक्षक,वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी पदांची भरती आणि नियुक्ती शासनाच्या विहित नियमांनुसारच..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्रातील विविध भागांत काही व्यक्ती वनरक्षक,वनपाल व वनपरिक्षेत्र अधिकारी पदांवर नियुक्ती करून देण्याचे खोटे आमिष दाखवून उमेदवारांची आर्थिक फसवणूक करत असल्याचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!