Tuesday, May 5, 2026
Homeकुरखेडाआंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू... - कुरखेडा तालुक्याच्या कढोली येथील...

आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू… – कुरखेडा तालुक्याच्या कढोली येथील तरुण..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

कुरखेडा(गडचिरोली) :-कुरखेडा तालुक्याच्या कढोली गावालगत असलेल्या सती नदीत आपल्या ३ मित्रांसह आंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा खोल पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना काल,मंगळवार दिनांक-१३ ऑगस्टच्या दुपारी ३ वाजताच्या सुमाराला घडली.त्यामुळे गावात एकच खळबळ उडाली.विकास ताराचंद सहारे वय २० वर्षे,रा.कढोली असे मृत तरुणाचे नाव आहे.

विकास हा काल,मंगळवारी कढोलीतील अमन निंबेकर,प्रज्योत सहारे,प्रणय सोनुले यांच्यासोबत गावालगत असलेल्या सती नदीत आंघोळीसाठी गेला होता.सध्या पाऊस थांबला असला तरी नदीच्या पाण्याची पातळी वाढलेलीच आहे.दरम्यान,चारही मित्र आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले.यावेळी मृत विकासला खोल पाण्याचा अंदाज आला नाही.मात्र, खोल पाण्यात गेल्याने विकास पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला.सहकारी मित्रांनी त्याला वाचविण्याचा आटोकाट प्रयत्न केला. मात्र,पोहता येत नसल्याने विकासचा बुडून मृत्यू झाला.घटनेची माहिती ग्रामस्थांना मिळताच नागरिकांनी नदीपात्र गाठून विकासचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.घटनेनंतर काही वेळाने विकासचा मृतदेह नदीपात्रात दूरवरून बाहेर काढण्यात आला.या संदर्भात आरमोरी पोलिसांना माहिती देण्यात आली.पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.मृतदेह शवविच्छेदनासाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला.याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर माय-लेकीच्या आत्महत्येप्रकरणी सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त   नागपूर :-नागपूरच्या नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील व्यंकटेशनगर परिसरात शुक्रवार,१ मे २०२६ रोजी सकाळच्या सुमारास माय-लेकीने एकाच वेळी घरातील एका लोखंडी रॉडला गळफास...

कृषी विभागाच्या प्रस्ताव प्रक्रियेत कोणतीही अनियमितता नाही- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ‘२० कोटींचे मागणीपत्र बनावट’ या वृत्तातील आरोपांचे खंडन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-कृषी विभागाने दिलेले २० कोटींचे मागणीपत्र बनावट असल्याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तातील आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून,सर्व प्रस्ताव शासनाच्या नियम व प्रशासकीय निकषांनुसारच...

धक्कादायक..! नियोजित कट रचून पत्नीने केली शिक्षक पतीची हत्या..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या भद्रावती तालुक्यातील घोडपेठ गावातील कर्मवीर शाळेजवळ दोन दिवसांपूर्वी आढळून आलेल्या मृतदेह प्रकरणी धक्कादायक बाबी पोलीस तपासात समोर आल्याने सर्वजण अवाक् झाले...

शंभर टक्के अनुदानावर मिळणार चार एकर कोरडवाहू किंवा २ एकर ओलिताखालील जमीन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजने अंतर्गत जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांकडून जमीन विक्रीचे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!