Friday, September 25, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न खासदार नामदेव किरसान यांनी संसदेत केला उपस्थित…

गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न खासदार नामदेव किरसान यांनी संसदेत केला उपस्थित…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली:-मागील अनेक वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यातील रेल्वेचा प्रश्न प्रलंबित आहे.प्रत्यक्षात रेल्वेचे काम संथगतीने सुरू आहे.त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम जलदगतीने करावे व बंद असलेल्या रेल्वेगाड्या चालू करण्याची मागणी गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी लोकसभेत केली. कोरोनाकाळापासून बलारशहा-वडसा-गोंदिया मार्गावरील काही ट्रेन बंद आहेत.त्यामुळे या मार्गांवर आवागमन करणाऱ्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.तर दुसरीकडे सिरोंचा,अहेरी भागातील रस्ते खराब असल्याने व नागपूरचा प्रवास या मार्गाने लांब होत असल्याने या भागातील नागरिक काजीपेठ मार्गे,काजीपेठ अजनी पॅसेंजर ट्रेनने प्रवास करीत होते.मात्र,ती ट्रेनसुद्धा कोरोनाकाळात बंद केल्यापासून अद्याप सुरू केली नाही.अहेरी-सिरोंचा परिसरातील नागरिकांना आवागमनाकरिता त्रास होत असून,वडसा ते चांदा फोर्ट,चांदाफोर्ट ते गोंदिया,गोंदिया ते रायपूर,काजीपेठ ते अजनी (नागपूर) या गाड्या कोरोनाकाळापासून बंद आहेत. त्या गाड्या पूर्ववत सुरू करण्यात याव्यात.गडचिरोली-वडसा,नागभीड-नागपूर रेल्वेचे काम जलदगतीने पूर्ण करण्यात यावे.वडसा आणि अन्य महत्वाच्या ठिकाणी जिथे रेल्वेच्या खाली भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत.तिथे तुडुंब पाणी भरत असल्याने लोकांना प्रवासाकरिता अडचण निर्माण होत आहे.अशा ठिकाणी प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी खा.डॉ.नामदेव किरसान यांनी पावसाळी अधिवेशनादरम्यान रेल्वेमंत्री वैष्णव यांच्याकडे केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!