Sunday, July 26, 2026
Homeनागभिडशेतात धान रोवणी करतांना वाघाचा हल्ला; शेतकरी जागीच ठार…-झुडपी जंगलात नेले फरफटत…

शेतात धान रोवणी करतांना वाघाचा हल्ला; शेतकरी जागीच ठार…-झुडपी जंगलात नेले फरफटत…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागभीड(चंद्रपूर) :-शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून जागीच ठार केल्याची घटना नागभीड वनपरिक्षेत्रातील मिंडाळा येथील कंपार्टमेंट क्र.४२०/ ७५६ मध्ये काल, मंगळवारी संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. दोडकू झिंगर शेंदरे वय ६५ वर्षे असे शेतकऱ्याचे नाव आहे.

नागभीड तालुक्यात गेले तीन दिवस अतिवृष्टी सुरू होती.या अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या धान पिकास फटका बसला.वाहून गेलेल्या धान्याच्या ठिकाणी दोडकू धान रोवणी करीत होता.त्याचे हे काम सुरू असतानाच वाघाने त्याच्यावर हल्ला चढवून त्याला जागीच ठार केले.ठार केल्यानंतर त्याला तो फरफटत लागूनच असलेल्या झुडपी जंगलात नेत असताना जवळ शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांचे लक्ष पडले.त्यांनी आरडाओरड करून गावात माहिती दिली.गावचे सरपंच गणेश गड्डमवार यांनी लागलीच वनविभाग आणि पोलिस विभागास माहिती दिली. माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी सुनील हजारे आणि ठाणेदार विजय राठोड घटनास्थळी दाखल झाले.संध्याकाळी ७ वाजता मृतकाच्या पार्थिवाचा मोका पंचनामा करण्यात आल्यानंतर शव उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात रवाना केले.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतातील सागवानाची ५०० झाडे जळून खाक; विद्युत वितरण कंपनीला ग्राहक आयोगाचा दणका..

उद्रेक न्युज वृत्त :-यवतमाळ जिल्ह्यातील नागरिक आपल्या न्याय हक्काचा लढा नेहमी लढतांना दिसून येतात.ग्राहक तक्रार निवारण आयोगात धाव घेत शेतकरी साहित्यातील त्रुटी असोत वा...

अखेर विद्यार्थी आंदोलनाचा मोठा विजय; केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा.

उद्रेक न्युज वृत्त :-गेल्या काही दिवसांपासून राजधानीतील जंतर-मंतर येथे नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आज...

नशामुक्त युवा विकसित भारत’ अभियानांतर्गत जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन.. – विजेत्या स्पर्धकांना जिल्हास्तरीय पारितोषिकांसह राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-भारत सरकारच्या युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालयाच्या मेरा युवा भारत(MY Bharat) उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या "नशामुक्त युवा विकसित भारत" या राष्ट्रव्यापी अभियानाच्या...

‘डायल ११२’ वर खोटी माहिती देत असाल तर सावधान; कारावासासह दंडाची शिक्षा.. – खोटी माहिती दिल्याने तरुणावर गुन्हा दाखल..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :- 'डायल ११२' हा भारत सरकारचा आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक आहे.याद्वारे आपत्कालीन परिस्थितीत पोलिस व इतर काही महत्त्वाच्या सेवा एकाच नंबरवर जलद...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!