Friday, September 4, 2026
Homeब्रम्हपुरीपुरामुळे देसाईगंज-ब्रम्हपुरी पर्यायी मार्गही बंद..-वैनगंगा नदी दुथळी; १२ गावांचा संपर्क तुटला..

पुरामुळे देसाईगंज-ब्रम्हपुरी पर्यायी मार्गही बंद..-वैनगंगा नदी दुथळी; १२ गावांचा संपर्क तुटला..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

ब्रम्हपुरी(चंद्रपूर) :- ब्रम्हपुरी तालुक्यात गत दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे.त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.पावसाचा हाहाकार सर्वत्र सुरू आहे.मुसळधार पावसामुळे वैनगंगा नदी दुथळी भरून वाहत असून ब्रम्हपुरी तालुक्यातील नाल्यांना पूर आला आहे.तर अनेक ठिकाणी रस्ते, पूल पाण्याखाली गेल्यामुळे १२ गावांचा संपर्क तुटला आहे.मागील दोन दिवसांपासून शहरी आणि ग्रामीण भागात पावसाची संततधार सुरू असून सर्वत्र पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.

ब्रम्हपुरी येथील भूतीनाल्यावर पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे ब्रम्हपुरीवरून देसाईगंजला ये-जा करण्यासाठी कच्चा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र,पावसामुळे तो रस्ता वाहून गेला.त्यामुळे वाहनचलकांना ब्रम्हपुरी-कुर्झा-अर्हेरनवरगाव-पिंपळगाव-सोंदरी देसाईगंज असा मार्गक्रम करित प्रवास करावा लागत आहे.अर्हेरनवरगाव ते कुर्झा नाल्यावर मागील दोन दिवसांपासून पाणी वाहत असल्याने ही वाहतूक ठप्प झाली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!