Saturday, September 5, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यातील शाळा पूर्ववत सुरू -शाळा सुरू होण्यापूर्वी दक्षता घेण्याबाबत शिक्षण विभागाचे आदेश…

गडचिरोली जिल्ह्यातील शाळा पूर्ववत सुरू -शाळा सुरू होण्यापूर्वी दक्षता घेण्याबाबत शिक्षण विभागाचे आदेश…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यात सतत चार दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन नदी,नाले ओसंडून वाहू लागले होते.पुरामुळे जिल्ह्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला होता.रस्ते, रपटे पाण्याखाली येऊन वाहतूक ठप्प झाली होती.संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले होते.अशातच गडचिरोली जिल्हाधिकारी संजय दैने यांनी दिनांक-२२ जुलै व २३ जुलै रोजी जिल्ह्यातील संपूर्ण शाळेला सार्वजनिक सुट्टी जाहीर केले होती.त्यानुसार आता आज,दिनांक-२४ जुलै रोजी शाळा पूर्ववत सुरू होणार आहेत.शाळा पूर्ववत सुरू करण्याअगोदर सर्वप्रथम शालेय इमारत धोकादायक असल्यास अशा इमारती/ खोलीमध्ये कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना बसवू नये,शाळा सुरु करण्यापूर्वी वर्गखोली किंवा शाळा परिसरात शाळेत साप,विंचू इत्यादी विषारी प्राणी नसल्याबाबत खात्री करुनच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्यात यावे. नैसर्गिक आपत्तीपासून कोणत्याही प्रकारची जीवीत हानी होणार नाही; यादृष्ठीने आवश्यक व्यवस्थापन करण्यासंदर्भात सर्व शिक्षक,मुख्याध्यापक,केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी यांना सुचित करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग गडचिरोली यांना सादर करण्याबाबत कळविण्यात आले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता दुर्गम व आदिवासीबहुल भागातील बालकांच्या पोषण-संगोपनासाठी ४५ पाळणाघरे.. – आज पहिल्या पाळणाघराचे उद्घाटन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील दुर्गम व आदिवासीबहुल भागातील तीन वर्षांखालील बालकांना योग्य पोषण, आरोग्य,सुरक्षित संगोपन आणि प्रारंभिक बालविकासाच्या सुविधा गावपातळीवर उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात...

साहित्यांची चोरी करणारा परप्रांतीय चोरटा पोलिसांच्या ताब्यात..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-बांधकाम सुरू असलेल्या घरातून कटर मशीन, ग्राइंडर मशीन,इलेक्ट्रिक साहित्य व अन्य साहित्यांची चोरी करणाऱ्या परप्रांतीय चोरट्यास चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने...

जमिनीच्या वाढीव मोबदल्यावरून वाद; एसडीओच्या खुर्चीसह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-शासनाने जमीन घेतली खरी,पण त्याचा योग्य वाढीव मोबदला दिला गेला नसल्याने याविरोधात कोर्टात आव्हान देण्यात आले.ज्यांची जमीन गेली,त्यांच्या बाजूने कोर्टात निर्णय लागला....

देसाईगंज शहरात खळबळ; महिला दारू विक्रेती चार जिल्ह्यांच्या सीमेबाहेर एक वर्षासाठी तडीपार..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्यात १९९२ पासून दारूबंदी आहे.तरीही गेल्या काही महिन्यांत लाखो रुपयांचा दारूसाठा व मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केल्याने जिल्ह्यात दारूबंदीचा बुरखा टराटरा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!