Sunday, October 4, 2026
Homeगडचिरोलीपुरात वाहून गेलेले,वीज कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या मृतकाचे वारसांना प्रत्येकी ४ लाखांचे धनादेश...

पुरात वाहून गेलेले,वीज कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या मृतकाचे वारसांना प्रत्येकी ४ लाखांचे धनादेश वितरीत… 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :-नैसर्गिक आपत्तीत वेगवेगळ्या घटनेत मृत झालेल्या अहेरी व एटापल्ली उपविभागातील तीन मृतकाच्या वारसांना प्रत्येकी ४ लक्ष असे एकूण १२ लक्ष रुपये मदतीचे धनादेश आज,२२ जुलै ला गडचिरोलीचे अप्पर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. 

दिनांक- ९ जुलै रोजी तोडसा येथे पुराच्या पाण्यामध्ये वाहून मयत झालेले अमित डोलू तीम्मा यांचे वारस वडील दोलू लुला तीम्मा यांना,२ जुलै रोजी मौजा- जीवनगट्टा येथील चंदू गिरमा पोरटेत हे वीज पडून मृत्यूमुखी पडले होते.त्याचे वारस पत्नी नामे प्रेमीला चंदू पोरतेट यांना तसेच मौजा- मरपल्ली येथील  अंकुश पांडू कुळयेटी हे दिनांक- ८ जुलै २०२४ रोजी  मरपल्ली नाल्या जवळ पाण्यात पडुन वाहून जाऊन मृत झाले होते.त्यांचे वारस आई नामे सुमन पांडू कुळयेटी यांच्या प्रत्यक्ष घरी जाऊन अप्पर जिल्हाधिकारी अहेरी यांच्या उपस्थितीत शासकीय मदतीची रक्कम धनादेशाद्वारे प्रदान करण्यात आली.

यावेळी आदित्य आंधळे गटविकास अधिकारी,सचिन  कन्नाके तालुका आरोग्य अधिकारी,पी.एन.उसेंडी तलाठी एटपल्ली, पी.डी.आत्राम तलाठी तोडसा,देवाजी गावडे कोतवाल,सुरेश दुर्गे कोतवाल,सचिन गेडाम कोतवाल आदी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

“उमेद मॉल”च्या माध्यमातून महिला उद्योजकांना मिळणार मोठे व्यासपीठ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या महिला स्वयं सहाय्यता समूहांच्या वस्तु व उत्पादन विक्रीसाठी हक्काची बाजारपेठ मिळवून देण्यासाठी राज्य...

अखेर भाजपचा सस्पेन्स संपला; विधान परिषदेच्या तीन उमेदवारांची घोषणा.. – नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी सुधाकर कोहळे..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासाठी काँग्रेसने डॉ.अभिजीत वंजारी यांना पुन्हा उमेदवारी दिल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांच्या घोषणेकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते.अश्यातच आता...

हातातोंडाशी आलेले पीक जंगली हत्तींमुळे उद्ध्वस्त; शेतकरी चिंताग्रस्त..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जंगली हत्तींचा कळप ऐन निसाव्यावर आलेल्या धानपिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस करीत असल्याने शेतकरी बांधव चिंताग्रस्त झाले आहेत. अश्यातच गेल्या तीन दिवसांपासून जंगली...

भरधाव ट्रेलरची दुचाकीला जोरदार धडक; पती-पत्नी व चार वर्षाच्या चिमुकल्याचा जागीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरहून बुटीबोरीकडे दुचाकीने निघालेल्या कुटुंबियांवर काळाने घाला घालून दुचाकीवरील पती, पत्नी व अवघ्या चार वर्षाच्या चिमुकल्याचा करून अंत झाला.तर त्यांचा ६...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!