उद्रेक न्युज वृत्त :-छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात ‘शिवशस्त्र शौर्यगाथा’ या शिवकालीन वस्तूंचे प्रदर्शन काल,शनिवारी खुले करण्यात आले.या प्रदर्शनात छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वाघनखांनी अफजलखानाचा कोथळा काढला,ती वाघनखे सर्वांचे आकर्षण ठरली.शनिवार हा सुट्टीचा दिवस असल्याने सकाळपासूनच छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालयात शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांची अक्षरशः झुंबड उडाली होती.यावेळी विद्यार्थी व नागरिक शिवकालीन शस्त्रांचे बारकाईने निरीक्षण करत होते.तसेच शस्त्रांची माहितीही टिपत होते.ज्या दालनात वाघनखे ठेवली आहेत,त्या परिसरात दिवसभर गर्दी होती.छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयात शिवकालीन वस्तूंची विविध दालने तयार करण्यात आली आहेत. या दालनांत विविध शिवकालीन वस्तू पाहण्यात सातारकर दंग झाले होते.शस्त्रास्त्रांसह मोगलांशी झालेल्या युद्धाप्रसंगी खजिन्यावर ताण पडू नये म्हणून वतनी मुलखातून रक्कम जमा करण्याबाबत छत्रपती शिवाजी महाराजांचे पत्र व पाटीलकी बहाल करणारे पत्रही विद्यार्थी न्याहाळत होते.छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा तसेच अन्य शिवकालीन वास्तू ठेवण्यात आल्या आहेत.शिवरायांचा पुतळा,वस्तू व विविध पत्रे पाहताना विद्यार्थी आणि नागरिकांना सेल्फी टिपण्याचा मोह आवरला नाही.प्रत्येक जण आपल्या मोबाईलवर फोटोसेशन करीत होते.असे वृत्त पुढारीने दिले आहे.
छत्रपती शिवरायांची वाघनखे ठरली सर्वांचे आकर्षण..-वाघनखे पाहण्यासाठी परिसरात दिवसभर गर्दी…
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
मुख्य संपादक
सत्यवान ए.रामटेके
मुख्य संपादक
RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

