Wednesday, September 23, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली : पुरामुळे २७ मार्ग बंद…

गडचिरोली : पुरामुळे २७ मार्ग बंद…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडल्याने २७ मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे शेकडो गावांचा संपर्क तुटला आहे.भामरागड गावात पर्लकोटा नदीच्या पुराचे पाणी शिरल्याने बाजारपेठ जलमय झाली आहे.तेथील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे कार्य आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि प्रशासनाने सुरु केले आहे. भामरागडमध्ये १०३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात आतापर्यंत २ मोठी जनावरे, ६ शेळ्यांचा मृत्यू झाला.शिवाय ७५ घरे आणि ६ गोठ्यांची पडझड झाल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले.सिरोंचा, भामरागड व गडचिरोली या तालुकास्थळी एसडीआरएफच्या प्रत्येकी एक अशा ३ तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

आज सायंकाळी ५.०० वाजेर्यंत खालील मार्ग बंद

१) आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (कुडकेली नाला) व (चंद्रा नाला) ता.भामरागड

२) अहेरी मोयाबिनपेठा  रस्ता वट्रा नाला ता. अहेरी 

३) कुरखेडा तळेगाव चारभट्टी रस्ता ता. कुरखेडा

४) आलापल्ली ते सिरोंचा राष्ट्रीय महामार्ग (गोलांकर्जी ते रेपनपल्ली भाग) ता. अहेरी

५)  जारावंडी ते राज्यसिमा भाग ता.धानोरा

६) पोर्ला वडधा रस्ता ता. कुरखेडा

७) वैरागड जोगिसाखरा शंकरपुर चोप कोरेगाव रस्ता ता.वडसा

८) कुरखेडा वैरागड ता. कुरखेडा 

९) करवाफा पोटेगाव रस्ता

१०) गोठनगाव सोनसूरी रस्ता ता. कुरखेडा

११) वडसा नवरगाव आंधळी चिखली रस्ता ता. देसाईगंज

१२) लखमापूर बोरी गणपुर हळदीमाल नाला

१३)आलापल्ली-भामरागड राष्ट्रीय महामार्ग (पर्ल कोटा नदी)

१४) रामगड सोनसरी उरांडी रस्ता

१५) भेंडाळा अनखोडा रस्ता ता.चामोर्शी 

१६) मुल हरणघाट रस्ता दहेगाव नाला ता. चामोर्शी 

१७) चांदेश्र्वर टोला रस्ता ता.चामोर्शी 

१८) फोर्कुडी मारकंडादेव रस्ता ता.चामोर्शी 

१९) वडसा नैनपुर विठ्लगांव रस्ता ता. कुरखेडा 

२०) चिखली धामदिटोला रस्ता ता. कुरखेडा 

२१) गोठनगाव चांदगाव रस्ता ता. आरमोरी 

२२) आरमोरी रमाळा रस्ता ता. आरमोरी 

२३) वैरागड कढोली रस्ता ता. आरमोरी 

२४) पेंढरी ढोरगट्टा रस्ता बांडिया नदि  ता.धानोरा

२५) भाडभिडी रेगडी देवदा रस्ता ता.चामोर्शी 

२६) कोनसरी जामगड रस्ता ता.चामोर्शी

२७) सारखेडा भापडा रस्ता ता.धानोरा

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी; संपाच्या पार्श्वभूमीवर सुट्टीच्या दिवशीही सुरू राहणार बँक..

उद्रेक न्युज वृत्त :-बँक ग्राहकांना दिलासा देणारी बातमी असून युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सने (यूएफबीयू)२८ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत पुकारलेल्या तीन दिवसीय...

बदलते हवामान; पाऊस घालणार थैमान..!

उद्रेक न्युज वृत्त :-सध्या हवामान बदलाचे संकेत असल्याने विदर्भातील नागपूर,यवतमाळ,चंद्रपूर, गोंदिया,भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांसह मुंबई मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात पावसाचा जोर वाढणार आहे.हवामान विभागाच्या...

उच्च न्यायालयाचा दणका; अतिदुर्गम भागात दुचाकीने पोहोचले जिल्हाधिकारी व अधिकारी..!

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम लष्कर,गोपणार,मुरडपार,हॅलोदंडी आणि धिरंगी या गावांच्या मूलभूत विकासाला प्राधान्य देऊन विविध विभागांच्या लोककल्याणकारी व विकास योजनांचा लाभ जास्तीत...

बँकेची कामे असतील तर लवकर उरकून घ्या; सलग ५ दिवस बँकिंग सेवा राहणार ठप्प..!

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स(यूएफबीआय)या बँक कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या संयुक्त संघटनेने विविध मागण्यांसाठी शुक्रवार ११ सप्टेंबर २०२६ रोजी एक दिवसीय देशव्यापी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!