Saturday, May 2, 2026
Homeगडचिरोलीअर्ज भरण्यासाठी सेतू चालकाकडून पैसे घेतल्याच्या वृत्ताची तात्काळ दखल…-लाडकी बहिण योजनेसाठी पैश्याची...

अर्ज भरण्यासाठी सेतू चालकाकडून पैसे घेतल्याच्या वृत्ताची तात्काळ दखल…-लाडकी बहिण योजनेसाठी पैश्याची मागणी केल्यास संपर्क साधण्याचे आवाहन- सीईओ गडचिरोली

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजने’चा अर्ज भरण्यासाठी सेतू चालकाकडून पैसे घेतल्याच्या वृत्ताची तात्काळ दखल घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांनी गट विकास अधिकारी सुरेंद्र गोंगले यांना चौकशीचे आदेश दिले होते.गोंगले यांनी पोटेगाव ग्रामपंचायत येथे सभा घेवून ‘मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेबाबत ग्रामस्थांना माहिती दिली.तसेच सेतू केंद्राची चौकशीही केली.संबंधित सेतू केंद्र चालक व गावातील नागरिकांचे बयान घेतल्यानंतर अर्ज नोंदणीचे पैसे घेण्यात आलेले नसून सहायक कागदपत्राच्या प्रिंट आऊटचे नियमानुसार पैसे घेण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली.या योजनेअंतर्गत सेतु सुविधा केंद्रातून ऑनलाइन नोंदणी होत नसल्याने ऑनलाइन साठी पैसे घेण्याचा प्रश्नच निर्माण होत नसल्याचा अहवाल त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांचेकडे सोपविला आहे.

दरम्यान या योजनेअंतर्गत अर्ज नोंदणीसाठी कुणी पैशाची मागणी करीत असल्यास त्याबाबत नजीकच्या गटविकास अधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय अथवा महिला व बालविकास कार्यालयात तसेच जिल्हा स्तरावर स्थापन करण्यात आलेल्या तक्रार निवारण व सहायता कक्षाच्या भ्रमणध्वनी क्रमांक ८९९९३६८९१५ व ८६९८३६१८३० यावर संपर्क करावा; असे आवाहन आयुषी सिंह यांनी केले आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

हॉटेलचा नाश्ता महागणार; व्यवसायिक सिलेंडरच्या दरात सर्वात मोठी वाढ.. – सर्वसामान्यांच्याच खिशाला कात्री..

उद्रेक न्युज वृत्त :-महिन्याच्या सुरुवातीलाच कमर्शियल म्हणजेच व्यवसायिक गॅस सिलेंडरच्या दरात मोठी वाढ करण्यात आली आहे.आज,शुक्रवार १ मे रोजी १९ किलोच्या व्यवसायिक सिलेंडरच्या किंमतीत...

उद्याला बारावीचा ऑनलाइन निकाल..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार,याची उत्सुकता असतांनाच राज्य बोर्डाने काल गुरुवारच्या रात्री परिपत्रक काढत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!