Wednesday, August 26, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्ततुरुंगातून लोकसभा निवडणूक जिंकणारे दोघेही आरोपी घेणार लोकसभा सदस्याची शपथ…-लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत...

तुरुंगातून लोकसभा निवडणूक जिंकणारे दोघेही आरोपी घेणार लोकसभा सदस्याची शपथ…-लोकसभा २०२४ च्या निवडणुकीत दोघेही झाले होते विजयी…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये काही जागांवर अतिशय धक्कादायक निकाल समोर आले होते.लोकसभा २०२४ च्या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी जाहीर झाला होता. दहशतवादाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेले दोन उमेदवार निवडणुकीत विजयी झाल्याने असामान्य परिस्थिती निर्माण झाली.त्यामुळे त्यांना मंत्रिपदाची शपथ घेता येईल का? ते संसदेच्या अधिवेशनात उपस्थित राहू शकतील का? असा प्रश्न अनेकांना पडला. कायद्यानुसार त्यांना नवीन सभागृहाच्या कामकाजात भाग घेण्याची परवानगी नसली तरी त्यांना खासदार म्हणून शपथ घेण्याचा घटनात्मक अधिकार आहे.

खलिस्तानी समर्थक अमृतपाल सिंग यांनी पंजाबच्या खदूर साहिब जागेवर विजय मिळवला.तर अभियंता अब्दुल रशीद शेख दहशतवादाला आर्थिक मदत केल्याच्या आरोपाखाली ९ ऑगस्ट २०१९ पासून तिहार तुरुंगात आहे.अमृतपाल सिंगला एप्रिल २०२३ मध्ये राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.त्यांना आसाममधील दिब्रुगड तुरुंगात पाठवण्यात आले होते. कायदेशीररित्या,अमृतपाल सिंग आणि अब्दुल रशीद शेख यांना १८ व्या लोकसभेच्या कामकाजात उपस्थित राहण्यास मनाई आहे; तरीही त्यांना संसद सदस्य म्हणून शपथ घेण्याचा घटनात्मक अधिकार कायम आहे; त्यानुसार वादग्रस्त खलिस्तान समर्थक नेते आणि खादूर साहिबचे नवनिर्वाचित खासदार अमृतपाल सिंग उद्या ५ जुलै रोजी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेणार आहेत.राज्य आणि केंद्रीय यंत्रणांनी मार्ग मोकळा करून त्यांना शपथ घेण्याची परवानगी दिली आहे. पंजाब सरकारच्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार,राष्ट्रीय सुरक्षा कायद्यांतर्गत (NSA) आसामच्या दिब्रुगढ तुरुंगात बंदिस्त असलेल्या अमृतपालला दिब्रुगडहून दिल्लीत आणले जाऊ शकते.उल्लेखनीय आहे की,पंजाब सरकारने काही दिवसांपूर्वी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना या संदर्भात निवेदन पाठवले होते.यापूर्वी अलीकडेच, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीने (एनआयए) तुरुंगात बंद काश्मिरी नेते शेख अब्दुल रशीद यांना २५ जुलै रोजी लोकसभा सदस्य म्हणून शपथ घेण्याची परवानगी दिली आहे. 

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!