Wednesday, August 26, 2026
Homeदेसाईगंजअखेर देसाईगंज येथील वादग्रस्त कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याची झाली बदली..-गडचिरोली जिल्हा परिषद...

अखेर देसाईगंज येथील वादग्रस्त कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याची झाली बदली..-गडचिरोली जिल्हा परिषद सीईओ चा धडकला आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’ अंतर्गत पंचायत समिती देसाईगंज येथील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे ग्राम रोजगार सेवक अडचणीत येऊन त्रस्त झाल्याने कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी(APO) रवींद्र गोपीनाथ राऊत वय ४२ वर्षे यांची देसाईगंज व्यतिरिक्त ईतरत्र बदली करण्यात यावी; अशी तक्रार ग्राम रोजगार सेवक संघटना देसाईगंजच्या वतीने गडचिरोली जिल्हा परिषद रोजगार हमी शाखेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना पंचायत समिती देसाईगंजचे गट विकास अधिकारी यांच्या मार्फतीने दिनांक- ३ मे २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती.

दिलेल्या तक्रारीत,देसाईगंज पंचायत समितीच्या रोजगार हमी योजनेच्या शाखेतील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी (APO) रवींद्र राऊत हे ग्राम रोजगार सेवकांना अवाच्छ भाषेत बोलणे, तांत्रिक अधिकाऱ्यांना पूर्व कल्पना न देणे,काम पूर्ण न होताच पूर्णत्वाचा दाखला अपलोड करणे,काही लाभार्थ्यांना अनुदानापासून वंचित ठेवणे व इतर अशी अनेक कारनामे करीत असल्याने गावपातळीवर ग्राम रोजगार सेवकांना अनेक लोकांचे बोलणे ऐकून घ्यावे लागत आहे.अशातही राऊत यांनी ग्राम रोजगार सेवकांना त्रास देण्याचा सपाटा चालविला आहे.मागील वर्षी देसाईगंज तालुक्यातील वयक्तिक योजनेच्या लाभार्थ्यांनी स्वतः पंचायत समितीचे गट विकास अधिकारी तसेच आरमोरी निर्वाचन क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांच्याकडे कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी राऊत यांची तक्रार केली होती. महत्वाचे म्हणजे राऊत यांनी कार्यालयातील तांत्रिक अधिकाऱ्यांना न विचारताच तसेच काम अपूर्ण असतांनाही पूर्णत्वाचे(CC) दाखले अपलोड केल्याने लाभार्थी उर्वरित अनुदानापासून अजूनही वंचित आहेत.सदरची बाब आमदार कृष्णा गजबे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी आमसभमध्ये राऊत यांना तंबी दिली होती.तसेच त्याबाबत विचरणा केली व आपल्या स्वभावात,वागणुकीत बदल करावा; यासाठी एकदा सूट दिली.मात्र राऊत यांच्यात कुठलाही बदल झालेला नाही.उलट त्यांनी ग्राम रोजगार सेवकांना त्रास देण्याचे काम सुरू केले आहे.परिणामी सर्व ग्राम रोजगार सेवक राऊत यांच्या वागणुकीमुळे त्रस्त झाले आहेत.परिणामी पंचायत समिती देसाईगंज येथील रोजगार हमी योजनेच्या शाखेतील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी(APO)रवींद्र राऊत यांना बदलविण्यात यावे; अन्यथा ग्राम रोजगार सेवक संघटना देसाईगंजच्या वतीने ग्राम रोजगार सेवक कामबंद आंदोलन कणार असल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले होते.ग्रामरोजगार सेवक संघटना देसाईगंज,गट विकास अधिकारी,पं.स.देसाईगंज यांचे चौकशी अहवाल तसेच आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे यांनी राऊत यांच्या कार्यप्रणालीबाबत नाराजी व्यक्त करुन त्यांची इतरत्र बदली करण्याबाबत कळविलेले होते.त्यानुसार गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह जिल्हा कार्यक्रम समन्वयक (मग्रारोहयो) आयुषी सिंह यांनी काल, दिनांक- ३ जुलै रोजी देसाईगंज येथील रोजगार हमी योजनेच्या शाखेतील कंत्राटी सहाय्यक कार्यक्रम अधिकारी(APO)रवींद्र राऊत यांची कुरखेडा पंचायत समितीती रोजगार हमी योजनेच्या शाखेत बदलीचे आदेश काढले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!