Wednesday, August 26, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुका स्तरीय दक्षता समिती अध्यक्षपदी सचिन वानखेडे यांची नियुक्ती…

देसाईगंज तालुका स्तरीय दक्षता समिती अध्यक्षपदी सचिन वानखेडे यांची नियुक्ती…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

देसाईगंज(गडचिरोली) :-जिल्हा स्तरावरील वा तालुका स्तरावरील विविध समित्यांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनता,गोर-गरीब व इतर नागरिकांच्या समस्या,प्रलंबित प्रकरणे तसेच प्राप्त तक्रारींची  सोडवून करण्यासाठी आणि शासकीय कामकाज लवकरात-लवकर व्हावे; यासाठी नामनिर्देशित करून अशासकीय विविध समित्या गठीत करण्यात येतात. मागील काही वर्षांपासून शासकीय स्तरावरील समित्या काही कारणास्तव गठीत करण्यात आल्या नव्हत्या.अशातच आता नुकत्याच गडचिरोली जिल्ह्यातील विविध अशासकीय समित्या गठित करण्यात आल्या आहेत.त्यानुसार नुकतीच देसाईगंज तालुका स्तरीय दक्षता समिती गठीत करण्यात आली आहे.सदर देसाईगंज तालुका स्तरीय दक्षता समितीच्या अध्यक्षपदी सचिन वानखेडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.सदरची नियुक्ती गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी केली.याबाबतचे नियुक्ती आदेश गडचिरोली जिल्हाधिकारी यांनी नुकतेच दिले आहे. तालुका स्तरीय दक्षता समितीच्या माध्यमातून तालुक्यातील संपूर्ण समित्यांचा आढावा घेणे,देखरेख ठेवणे,प्रलंबित प्रकरणांचा त्वरित निपटारा करणे व इतर विविध कार्ये पार पाडण्यात येणार आहेत.

सचिन वानखेडे यांची देसाईगंज तालुका स्तरीय दक्षता समिती अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याने,नियुक्तीचे श्रेय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस,आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे,गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे,गडचिरोली-चिमूर लोकसभा प्रमुख किसन नागदेवे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा,युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल तिडके,देसाईगंज तालुकाध्यक्ष सुनिल पारधी (ग्रामीण), देसाईगंज शहराध्यक्ष सचिन खरकाटे,जिल्हा महामंत्री सदानंद कुथे,माजी नगराध्यक्ष शालुलाई दंडवते,माजी नगरसेवक राजु जेठानी यांना दिले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!