Thursday, April 30, 2026
Homeगडचिरोलीप्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीस भूलथापा देणाऱ्या पोलीस शिपायास अटक…-गडचिरोली येथील पोलिस शिपायाचा...

प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणीस भूलथापा देणाऱ्या पोलीस शिपायास अटक…-गडचिरोली येथील पोलिस शिपायाचा कारनामा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- एका तरुणीला भूलथापा देऊन प्रेमाच्या जाळ्यात ओढणारा व लैंगिक संबंधाचे व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन सव्वातीन लाख रुपयांची खंडणी मागणारा पोलिश शिपाई पद्माकर भागवान भोजने वय ३८ वर्षे याच्यावर पीडित तरुणीच्या तक्रारीवरुन लैंगिक शोषण,अनुसूचित जाती,जमाती अत्याचार प्रतिबंधीत कायद्यान्वये गुन्हा दाखल करीत अटक करण्यात आली.आरोपी पोलिस शिपायास न्यायालयात हजर केले असता; त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी

सुनावण्यात आली आहे.सराईत गुन्हेगाराला लाजवेल असा हा गुन्हा पोलिस शिपाई पद्माकर भोजने याने केला आहे.तो विवाहित असताना देखील पत्नीला घटस्फोट दिल्याचा बहाणा करीत त्याने २७ वर्षीय पीडित तरुणीला लग्नाचे खोटे आश्वासन देऊन आपल्या जाळ्यात ओढले होते.पद्माकर भोजने हा गडचिरोली जिल्हा पोलिस मुख्यालयात कार्यरत असून,त्याने भूलथापा देऊन पीडित युवतीसोबत प्रेमसंबंध निर्माण केले.दरम्यान लग्नाचे आमिष दाखवून वारंवार पीडितेचे लैंगिक शोषण केले.

इतकेच नाही तर लैंगिक शोषणाचा व्हिडीओ रेकॉर्ड करुन समाज माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन त्याने पीडितेकडे दीड लाखाच्या दागिन्यासह रोख तीन लाख रुपयांची मागणी केली होती.पोलिस शिपायाद्वारे फसल्या गेल्याची बाब पीडितेच्या लक्षात येताच तिने त्याच्याविरुद्ध गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.तक्रारीअंती पोलिसांनी भोजने यांचेवर लैंगिक अत्याचार, ॲट्रॉसिटी ॲक्ट,आदी कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे.न्यायालयात आरोपीस हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. प्रकरणाचा पुढील तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; चंद्रपूर पोलिस अधीक्षक पदाची सूत्रे आता आयुष नोपानी यांच्याकडे..

उद्रेक न्युज वृत्त :-ऐन महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच आज,गुरुवार ३० एप्रिल रोजी राज्यातील तब्बल २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या(भारतीय पोलीस सेवा)बदल्या करण्यात आल्या आहेत.यात चंद्रपूरचे विद्यमान...

“आपण लोकांची कामे करण्यासाठी बसलो आहोत; अडवणूक करण्यासाठी नाही”.. -सहपालकमंत्र्यांकडून अधिकाऱ्यांची कानउघडणी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संपूर्ण मॅपिंग करून शासनाने स्वतः त्यांच्या दारात जाऊन गरजेनुसार योजनांचा लाभ द्यावा,अशी भूमिका कृषी राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष...

अखेर कुरखेडा नगरपंचायत सफाई कामगारांच्या बेमुदत संपावर तोडगा; संप मागे..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-कुरखेडा नगरपंचायत अंतर्गत कार्यरत सफाई कामगारांंनी थकीत वेतनाकरीता मागील २३ एप्रीलपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते.त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण...

कायदा हा लवचिक आणि बदलत्या काळाशी सुसंगत असावा- सर्वोच्च न्यायालय – गर्भपाताची परवानगी दिली नाही; तर पीडितेच्या मनावर आयुष्यभर न पुसली जाणारी जखम आणि...

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच २४ एप्रिल २०२६ रोजी न्यायमूर्ती बी.व्ही.नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या खंडपीठाने एका १५ वर्षीय बलात्कार पिडीत तरुणीला ३० आठवड्यांचा...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!