Saturday, June 13, 2026
Homeसिरोंचाचोरट्यांनी अंगणवडीतील साहित्यांवर हप्ताभर मारला डल्ला-सिरोंचा तालुक्यात चोरट्यांनी घातला धुमाकूळ…

चोरट्यांनी अंगणवडीतील साहित्यांवर हप्ताभर मारला डल्ला-सिरोंचा तालुक्यात चोरट्यांनी घातला धुमाकूळ…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

सिरोंचा (गडचिरोली) :- गडचिरोली जिल्ह्याच्या सिरोंचा तालुक्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.चोरटे दुसरीकडे डल्ला न मारता चक्क लहान मुलांच्या अंगणवडीतील साहित्यावर हात साफ करून चोरटे पसार होऊ लागले आहेत.चोरट्यांनी एकाच आठवड्यात सिरोंचा तालुक्यातील सहा अंगणवडीतील साहित्य लंपास केल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सिरोंचा तालुक्यात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.इंद्रावती तसेच गोदावरी व प्राणहिता नदीवर पुलाची निर्मिती झाल्यापासून तेलंगाणा तसेच छत्तीसगड राज्यातील चोरटे सिरोंचा तालुक्यात चोरी करून आपल्या राज्यात पसार होत आहेत.अशातच चोरट्यांनी एका आठवड्यात सिरोंचा तालुक्यातील चिंतरवेला येथील अंगणवाडीतून २ गॅस सिलींडर,भांडे लंपास केले.याच अंगणवाडीतून ९ जून रोजी सोलर बॅटरी व इतर वस्तू लंपास केल्या.अंकिसा अंगणवाडी केंद्रातून सोमवारी दि.१७ जून रोजी गॅस सिलींडर,गॅस शेगडी,आहार शिजविण्याचे भांडे व इतर वस्तू लंपास केल्या.वडधम येथील अंगणवाडीतून १२ जून रोजी एलईडी टीव्ही,गॅस शेगडी,कुकर,सोलर ईन्व्हर्टर,सोलर पॅनल व अन्य साहित्य लंपास केले. मंगळवारी दि.१८ तुमनूर माल अंगणवाडी केंद्रातून एलईडी टीव्ही,बॅटरी,गॅस शेगडी,सिलींडर,पंखा,७ पॉकेट खाद्य तेल लंपास केले.याच दिवशी तुमनूर चेक अंगणवाडी केंद्रातून एलईडी टीव्ही,सोलर,ईन्व्हर्टर, सोलर बॅटरी,सिलींग फॅन व अन्य साहित्य लंपास केले. यासंदर्भात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

​देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात परिचारिकेच्या प्रसंगावधनाने वाचले प्रसूतीपश्चात मातेचे प्राण..

उद्रेक न्युज वृत्त  ​गडचिरोली :-देसाईगंज ग्रामीण रुग्णालयात एका प्रसूतीपश्चात मातेला हृदयविकाराचा झटका(Cardiac Arrest)आला असता कर्तव्यावर असलेल्या परिचारिकेने अत्यंत कौतुकास्पद कामगिरी करत आणि तत्परतेने सीपीआर(CPR)देऊन मातेचे...

त्वरा करा..! रेशन दुकानातून तांदूळ अन् गहू उचलण्यासाठी उरले केवळ दोनच दिवस..

उद्रेक न्युज वृत्त :-गरजू नागरिकांना पुरवठा विभागातर्फे स्वस्त धान्य दुकानांमधून धान्य वितरण करण्यात येते.मे व जून महिन्याचे धान्य वाटप करण्याची अंतिम तारीख १५ जून...

खर्रा खाणाऱ्यांनो सावधान..! बाजारात नकली तंबाखूचा शिरकाव.. – मशीनच्या सहाय्याने नकली तंबाखू तयार करणाऱ्यासह ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विदर्भातील बऱ्याचश्या जिल्ह्यात आजही जवळपास ७० ते ८० टक्के लोकं खर्रा खाण्याचे शौकीन आहेत.तंबाखूची वाढती मागणी लक्षात घेता "मरणारे मरोत आणि...

देसाईगंज शहरातील पाणी पुरवठा योजनेचे काम संथगतीने करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत देसाईगंज शहरात कोट्यवधी रुपयांचे पाणी पुरवठा योजनेचे बांधकाम संथगतीने सुरू असल्याने कामाच्या विलंबामुळे शहरातील नागरिकांना पिण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!