Wednesday, September 2, 2026
Homeगडचिरोलीगडचिरोली जिल्ह्यासह जगाशी संपर्क तुटणाऱ्या गावांतील रस्ते व पुलांचे काम कुठपर्यंत आले?-मुंबई...

गडचिरोली जिल्ह्यासह जगाशी संपर्क तुटणाऱ्या गावांतील रस्ते व पुलांचे काम कुठपर्यंत आले?-मुंबई उच्च न्यायालयाने गडचिरोली जिल्हाधिकारी व सार्वजनीक बांधकाम विभागाला दिले आदेश..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- जिल्ह्यातील दुर्गम भागात असलेल्या वेंगणूर,सुरगाव,अळंगेपल्ली व पडकाटोला या गावांना मुख्य भागासोबत जोडण्यासाठी बांधण्यात येत असलेले रस्ते व पुलांचे काम कुठपर्यंत आले?अशी विचारणा करीत रस्ता निर्मितीबाबतच्या अहवालासह प्रत्यक्ष हजर रहा; असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने बुधवारी दि.१९ जून ला जिल्हाधिकारी व सार्वजनीक बांधकाम विभागाला दिले आहे.

सदर प्रकरणावर न्यायमूर्ती नितीन सांबरे व न्या. अभय मंत्री यांच्यासमक्ष सुनवाणी झाली. गडचिरोलीतील दुर्गम गावातील नागरिकांनी २०२२ मध्ये उच्च न्यायालयाला पत्र लिहून व्यथा कळवल्या होत्या.त्यामुळे न्यायालयाने यासंदर्भात स्वतःच जनहित याचिका दाखल करुन घेतली आहे. पावसाळ्यात दिना धरणामध्ये पाणी भरल्यानंतर संबंधित गावे सहा ते सात महिन्यांसाठी संपर्काबाहेर जातात.त्यांचा जिल्ह्यासह जगाशी संपर्क तुटतो. दरम्यान,नागरिकांना आरोग्य व इतर आवश्यक सेवांकरिता नावेने धोकादायक प्रवास करावा लागतो.परिणामी अकस्मात परिस्थितीत नागरिकांना वेळेवर आरोग्य सेवा उपलब्ध होत नाही. या काळात अनेक नागरिकांना विविध कारणांमुळे प्राणही गमवावे लागतात.बुधवारी झालेल्या सुनावणीत जिल्हाधिका-यांच्या वतीने या गावांमध्ये विकास कार्य होत असल्याची माहिती दिली.मागील सुनावणीत न्यायालयाने जिल्हाधिका-यांना कार्याबाबत विचारणा करीत प्रगती अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते.मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही जिल्हाधिकारी यांनी प्रगती अहवाल सादर न केल्याने न्यायालयाने जिल्हाधिकारी तसेच सार्वजनीक बांधकाम विभागाच्या अधिका-यांनी प्रत्यक्ष हजर राहून कामाचा अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

जिल्हा परिषद पदभरती; १९२ उमेदवारांची अंतिम प्रतीक्षा सूची जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत गट-क व गट-ड मधील रिक्त असलेली विविध संवर्गांची पदे अनुसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून शैक्षणिक अर्हता व...

महाराष्ट्र राज्य नाट्य स्पर्धेसाठी ऑनलाईन प्रवेशिका आमंत्रित.. – हौशी मराठी,हिंदी,संगीत,संस्कृत तसेच बालनाट्य व दिव्यांग बाल नाट्य स्पर्धांचा समावेश..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२६ पासून सुरु होणाऱ्या हौशी मराठी,हिंदी,संगीत व संस्कृत राज्य नाट्य स्पर्धांसाठी तसेच बालनाट्य स्पर्धा...

फिरत असतांनाच हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-प्रकृती निरोगी राहण्यासाठी नियमित सकाळी फिरायला जाणे व जिम करणे,अशी दिनचर्या सुरू केलेली असतांनाच घराबाहेर पडलेल्या एका अधिकाऱ्याचा हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू...

ग्रामसेवकांची वर्षातून केवळ एकच संवैधानिक ग्रामसभा घेण्याची मागणी..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्याच्या शिवरे दिगर येथे १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास ग्रामसभे दरम्यान झालेल्या गोंधळ व दबावामुळे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!