Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीअवाढव्य वृक्ष अंगावर कोसळल्याने इसमाचा जागीच मृत्यू….

अवाढव्य वृक्ष अंगावर कोसळल्याने इसमाचा जागीच मृत्यू….

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- चालत्या दुचाकीवर वृक्ष कोसळल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना एटापल्ली तालुक्यातील उडेरा-बुर्गी मार्गावर शुक्रवारी दि. १४ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.नेवलू मासू गावडे वय ४० वर्षे रा.पुरसलगोंदी ता. एटापल्ली असे मृतकाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार,नवलू गावडे व पत्नी पोवरी हे दोघेही पती-पत्नी शुक्रवारी दि.१४ जून ला सायंकाळी पुरसलगोंदी गावावरून एका लग्न समारंभासाठी करपनफुंडी येथे एमएच ३३ ए ६२८२ क्रमांकाच्या दुचाकीने जात होते.दरम्यान,उडेरा ते बुर्गी गावाच्या मध्ये पोहोचल्यानंतर अचानक वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली.

वाटेत पत्नी पोवरी लघुशंकेसाठी दुचाकीवरून खाली उतरली.नेवलू हा थोडा पुढे जाऊन थांबण्याच्या बेतात असतानाच,जोरदार वादळाने रस्त्याच्या कडेचा वृक्ष नेवलूच्या दुचाकीवर कोसळला.अवाढव्य वृक्ष अंगावर कोसळून नेवलूचा जागीच मृत्यू झाला. घटनेच्या माहितीवरुन, पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे पाठविला. नेवलूच्या मृत्यूने गावात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. शासनाने परिवाराला आर्थिक मदत करावी, अशी मागणी नातेवाईक व नागरिकांनी केली आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मोहर्ली वनपरिक्षेत्रात वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना मोहर्ली वनपरिक्षेत्राच्या मोहर्ली बिटातील १५४ कक्ष क्रमांकात...

ई-पीक पाहणी नोंद घेणाऱ्यांकडून पैश्याची मागणी; तहसील कार्यालयात करा तक्रार..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत बदल करून गावनिहाय नियुक्त करण्यात आलेल्या पीक पाहणी सहाय्यकांमार्फत पिकांची नोंद करण्यात येत आहे.विशेष म्हणजे,शासकीय योजना,पीक कर्ज...

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!