Wednesday, September 9, 2026
Homeगोंदिया५५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला रेल्वे रूळाजवळ..-मृतदेहाचे दोन्ही पाय बांधलेले होते शर्टने…

५५ वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला रेल्वे रूळाजवळ..-मृतदेहाचे दोन्ही पाय बांधलेले होते शर्टने…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- आमगाव-देवरी मार्गावरील बाह्मणी रेल्वे चौकीपासून शंभर फूट अंतरावरील रेल्वे रूळाजवळ काल,११ जून रोजी सकाळी ७ वाजता एका व्यक्तीचा मृतदेह आढळला.त्या मृतदेहाचे पाय शर्टने बांधलेले होते.त्यामुळे त्याचा खून करून मृतदेह रेल्वे रूळाजवळ टाकला असावा; असा कयास लावला जात आहे.राजेश तुकाराम शिवणकर वय ५५ वर्षे,रा. भजेपार ता.सालेकसा असे मृताचे नाव आहे.राजेश शिवणकर हा १० जून रोजी रात्री १० वाजता जेवण करून घरून निघाला होता.नहेमीप्रमाणे तो गावातच असेल असे घरच्या लोकांना वाटले होते.परंतु मध्यरात्रीनंतरही तो घरी न परतल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला.मात्र त्याचा पत्ता लागला नव्हता.११ जूनच्या सकाळी रेल्वे रूळानजीक राजेश शिवणकरचा मृतदेह आढळला.त्याचे दोन्ही पाय बांधले असल्याने त्याचे पाय बांधून त्याला रेल्वे रुळावर टाकण्यात आले की आधी खून करून नंतर रेल्वे रुळावर टाकण्यात आले; याचा तपास सुरू आहे.सध्या चर्चेला उधाण आले असून घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी होती.घटनेची माहिती मिळताच आमगाव पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.घटनेची नोंद करून पुढील तपास पोलिसांनी सुरू केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पावसाची विश्रांती; पाण्याचे योग्य नियोजन करण्यासह तण,खत तसेच कीड-रोग व्यवस्थापनाकडे शेतकऱ्यांनी विशेष लक्ष द्यावे- कृषी विभाग

उद्रेक न्युज वृत्त :-राज्याच्या विविध भागात ऑगस्ट व सप्टेंबरच्या सुरुवातीला झालेल्या पावसानंतर सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे.अशा परिस्थितीत धान पिकावर पाण्याचा ताण येऊ नये...

आज डोंगरगाव-हलबी येथे एकल महिला मेळावा संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आज,बुधवार ९ सप्टेंबर रोजी देसाईगंज तालुक्याच्या गट ग्रामपंचायत डोंगरगाव-हलबी येथे परिसरातील चिखली रिट व अरततोंडी येथील...

देसाईगंज पोलिसांची मोठी कामगिरी; हरविलेले २५ मोबाईल मूळ मालकांना परत..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-एकदा कां मोबाईल हरवला, तर तो परत मिळण्याची शाश्वती कमीच असते.मात्र, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर व नागरिकांच्या तक्रारींना त्वरित प्रतिसाद देत देसाईगंज...

गणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी; राज्यभर २० हजार मोफत आरोग्य तपासणी शिबिरे.. – सर्व ३६ जिल्ह्यांत उपक्रमाची व्याप्ती..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-श्रीगणेशोत्सवात भक्तांच्या आरोग्याची काळजी घेत मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या पुढाकाराने राज्यभर सुमारे २० हजार मोफत आरोग्य तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!