Monday, August 10, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता आधार कार्डवरील छायाचित्रही करता येणार  अपडेट…

आता आधार कार्डवरील छायाचित्रही करता येणार  अपडेट…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- प्रत्येक भारतीय नागरिकाच्या दृष्टीने आधार कार्ड हे महत्त्वपूर्ण दस्तऐवजांपैकी एक आहे.आधार कार्ड नागरिकाचे अधिकृत ओळखपत्र असून,कोणत्याही आर्थिक देव-घेवीसाठी आणि सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधारकार्ड अनिवार्य आहे.आधार कार्ड जारी करणारी संस्था ‘UIDAI’ असून आधारकार्ड वरील माहिती अपडेट करण्याची सुविधा आता ‘UIDAI’च्या द्वारे ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आली आहे.या अंतर्गत आधारकार्ड धारकाचे नाव,जन्मतारीख इत्यादी माहितीमध्ये चुका असल्यास,किंवा आधारकार्ड धारकाचा पत्ताबदल करायचा असल्यासही योग्य दस्तऐवजांच्या सह ऑनलाईन माहिती अपडेट करणे आता शक्य झाले आहे.

अनेकदा आधारकार्डावरील कार्ड धारकाचे छायाचित्र जुने असते,किंवा अस्पष्ट असते.आता हे छायाचित्र देखील कार्डधारकांना अपडेट करता येणार असून, यासाठी दोन पद्धतींचा वापर करता येणार आहे. पहिली पद्धत ही, की आपल्या आधारकार्डवरील छायाचित्र बदलण्याची लेखी विनंती ‘UIDAI’ च्या कार्यालयामध्ये करून आधारकार्डवर छायाचित्र अपडेट करविता येऊ शकते.या लेखी विनंतीपत्राच्या सोबत सध्या अस्तित्वात असलेल्या आधारकार्डची प्रत आणि अपडेट करायचे असलेले नवे छायाचित्र UIDAIच्या कार्यालयामध्ये द्यायचे असते. जर विनंतीपत्र मान्य झाले आणि इतर माहितीही योग्य असली, तर साधारण पंधरा ते वीस दिवसांमध्ये अपडेट झालेले नवे छायाचित्र असणारे नवे आधारकार्ड अर्ज करणाऱ्याला मिळू शकते. आधार कार्डवरील छायाचित्र अपडेट करण्यासाठी असलेल्या आणखी एका पद्धतीनुसार UIDAI च्या अधिकृत वेबसाईटवरून ‘एनरोलमेंट फॉर्म’ डाउनलोड करून तो फॉर्म योग्य माहितीच्या आधारे भरावा. हा भरलेला फॉर्म आपल्या घराजवळील आधार एनरोलमेंट सेंटरवर जमा करायचा असून,तिथे ‘बायोमेट्रिक’ साठी आवश्यक असलेली प्रक्रियाही पूर्ण करायची असते. त्यानंतर कार्डधारकाचा फॉर्म स्वीकारणारा कर्मचारी, कार्ड धारकाचे नवे छायाचित्र घेत असून, त्यासाठी पंचवीस रुपये शुल्क आकारले जाते.या पंचवीस रुपयांच्या शुल्कावर अतिरिक्त जीएसटी ही लागू असतो. या शुल्काचा भरणा केल्यानंतर कार्डधारकाला ‘युआरएन’ नंबर असलेली पावती देण्यात येऊन या नंबरच्या आधारे कार्डच्या अपडेटची माहिती ऑनलाईन उपलब्ध होत असते.छायाचित्र अपडेट झाल्यानंतर नवे छायाचित्र असलेले आधारकार्ड कार्डधारकाला देण्यात येते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दुःखद घटना..! तीन शालेय विद्यार्थिनींचा सर्पदंशाने मृत्यू; तर अन्य तीन विद्यार्थिनींवर उपचार सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या धानोरा तालुक्यातील जपतलई येथील अनुदानित आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे.या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल...

आरमोरी येथे आरपीआयची बैठक संपन्न; विविध विषयांवर विचारमंथन..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(आरपीआय)च्या वतीने आरमोरी येथील विश्राम गृहात नुकतीच पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत पक्ष संघटन मजबूत करण्यासह विविध सामाजिक,राजकीय...

देसाईगंजच्या शंकरपूर येथे जागतिक आदिवासी दिन साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या  आदिवासी गोंड गोवारी समाज संघटना शाखा शंकरपूर यांच्या वतीने आज,रविवार ९ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून गावात विविध कार्यक्रमांचे आयोजन...

आता गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीवर आकारला जाणार दहापट दंड..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गौण खनिजांच्या अवैध उत्खनन व वाहतुकीला प्रभावी आळा घालण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता,१९६६ मधील कलम ४८(७)मध्ये सुधारणा करण्यास मंगळवार २८ जुलै...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!