उद्रेक न्युज वृत्त :-नरेंद्र मोदी यांनी आज राजधानी दिल्लीत तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली.पंतप्रधान मोदी आज सकाळीच राजघाटावर पोहोचले आणि ते राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या समाधीवर नतमस्तक झाले.त्यानंतर त्यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या समाधीचे दर्शन घेतले.तसेच वॉर मेमोरिलला भेट देऊन वीर जवानांना अभिवादन केले.९००० पाहुण्यांच्या उपस्थितीत मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.याबरोबरच कॅबिनेट मंत्रिमंडातील काही मंत्र्यांनीही शपथ घेतली.
पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांना १.६६ लाख रुपये प्रती महिना पगार मिळेल.यात ५० हजार रुपये बेसिक,३००० रुपये एक्सपेंस अलाउन्स, ४५००० पार्लियामेंटरी अलाउन्स(भत्ता),२००० रुपये डेली अलाउन्सचा समावेश असतो.पगाराशिवाय देशाच्या पंतप्रधानांना विविध सुविधा देखील मिळतात.यात सरकारी घर,एपीजी सुरक्षा व्यवस्था,सरकारी वाहन, एअरक्राफ्ट,आंतरराष्ट्रीय ट्रिप,फूड एक्सपेन्सेस,टेलिफोन कनेक्शन,कर्मचारी अशा सुविधा दिल्या जातात.
याशिवाय पंतप्रधानांना परदेश यात्रांसाठी सरकारकडून यात्रा भाडे,तिथे थांबण्याचा आणि जेवणाचा खर्चही दिला जातो.याशिवाय निवृत्तीनंतर पाच वर्षांपर्यंत निवासस्थान,वीज,पाणी,सुरक्षा व्यवस्था सुरु राहाते.याशिवाय अनेक टॅक्स फ्री भत्तेही मिळतात.यात ट्रेन,विमानाची मोफत यात्रा,वैद्यकिय सुविधा आणि कार्यालयाचा खर्च म्हणून वर्षाला १,००००० रुपयांचा समावेश असतो.

