Saturday, June 27, 2026
Homeनागपूरबंटी-बबली कडून चिमुकल्याचा अपहरण..-आरोपीच्या फोन पे बिलावरून पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

बंटी-बबली कडून चिमुकल्याचा अपहरण..-आरोपीच्या फोन पे बिलावरून पोलिसांनी आवळल्या मुसक्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- एखाद्या चित्रपटा प्रमाणे रेल्वे स्थानकावरून ज्या पद्धतीने बंटी-बबलीने सहा महिन्यांच्या चिमुकल्याचे अपहरण केले; त्यावरून ते दोघे बाळ चोरणारे सराईत गुन्हेगार असावे; असा संशय घटनाक्रमातून पुढे आला आहे.चिमुकला नजरेस पडताक्षणीच त्या दोघांनी त्याचे अपहरण करण्याचा कट रचला असावा; असाही संशय आहे.काल,गुरुवारी पहाटे ४:१५च्या सुमारास रेल्वे स्थानकावर ही घटना घडली.

अपहृत बाळाची आई भीक मागते.ती मूळची मध्य प्रदेशातील आहे.तिच्यासोबत पतीसारखा राहणारा तरुण वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असून तो नागपुरात मिळेल ते काम करतो अन् काम नाही मिळाले तर भीक मागून खातो.दोन वर्षांपूर्वी हे दोघे एकमेकांना दिसले अन् ते नंतर पती-पत्नीसारखे एकमेकांसोबत राहू लागले, मिळेल ते खायचे.कधी ताजबाग,कधी रेल्वेस्थानक तर कधी कुठेही जागा मिळेल,तेथे झोपायचे; असा त्यांचा दिनक्रम आहे.बुधवारी दुपारी ३ ते ४ च्या सुमारास भीक मागणारी तरुणी आरोपी बंटी-बबलीजवळ आली.तिने पाच-दहा रुपये द्या,असे म्हटले.तिच्या कुशीत चिमुकला असल्याचे दिसताच बंटी- बबलीने त्याच्या अपहरणाचा कट रचला.महिला आणि तिच्या पतीला विश्वासात घेत खाऊ-पिऊ घातले.त्यांना चांगला रोजगार देण्याचे आमिष दाखवले.आम्ही दोघे प्रेमविवाह करण्यासाठी घरून पळून आलो.तुमच्यासोबत आज राहू; असे म्हणत तुम्ही कुठे राहता,अशी विचारणा केली.आमचे काही घर नाही,जागा मिळाली तेथे झोपतो; असे भिक्षेकरी दाम्पत्याने म्हणताच या बंटी-बबलीने त्यांना सायंकाळच्या गाडीने शेगावला दर्शनाला जाऊ; असे म्हटले.

गाडीला वेळ असेपर्यंत रेल्वेस्थानकावर राहू,असेही म्हटले.नंतर आरोपी महिला बाळाच्या आईला घेऊन रेल्वेस्थानकावर आली.तर,चिमुकल्याच्या पित्याला घेऊन आरोपी एका बारमध्ये गेला.तेथे त्याला आरोपीने यथेच्छ दारू पाजली.५६० रुपयांचे दारूचे बिल आरोपीने फोन पे ने चुकते केले.रेल्वेस्थानकावर आल्यानंतर सेवाग्राम एक्स्प्रेसची शेगावला जाण्यासाठी चार तिकिटे काढली.शेगावला जाईपर्यंत जेथे संधी मिळेल तेथे चिमुकल्याला घेऊन पळायचे, असा आरोपीचा कट होता.मात्र,रेल्वेगाडीत चढल्यानंतर किरकोळ कारणावरून बाळाच्या आई-वडिलांत कडाक्यात भांडण झाले.त्यामुळे ती रागात गाडीखाली उतरली अन् आपण कुठेही येणार नाही,असे तिने म्हटले.त्यामुळे बाळाच्या पित्यासह आरोपीही खाली उतरले.आरोपींचा ‘प्लॅन ए’ फसला.बाळाचे आई-वडील पहाटे २ वाजेपर्यंत फलाटावर भांडत होते.त्यांनी या दोघांना कसेबसे शांत केले आणि ते गाढ झोपेत असताना आरोपी महिलेने पहाटे ४.१५ ला चिमुकल्याला उचलून घेत फलाटावरून पळ काढला.एकूणच घटनाक्रमावरून आरोपी मुले चोरणारे सराईत गुन्हेगार असावे,असा तर्क आहे.

अपहरणाची तक्रार मिळताच पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे,ठाणेदार मनीषा काशिद यांनी बाळाच्या आई-वडिलांना खोदून खोदून माहिती विचारली.त्यात बियरबारमध्ये दारूचे बिल आरोपीने फोन पे ने चुकता केल्याची माहिती पुढे आली.हाच धागा पकडून बारमधून आरोपीचा मोबाईल नंबर शोधला.काल, गुरुवारी त्याचे लोकेशन तेलंगणातील मंचेरियात असल्याचे स्पष्ट झाले,त्यामुळे तेथे पथक पाठवून मंचेरिया पोलिसांच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी गुरुवारी रात्री त्याच्या मुसक्या बांधल्या.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

विजांच्या कडकडाटासह पाऊस; अंगावर वीज कोसळून दोघांचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्यात आज,शुक्रवार २६ जून रोजी विविध भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने हजेरी लावली.मात्र,विजांच्या कडकडाटासह झालेल्या मुसळधार पावसामुळे काही तालुक्यात वीज कोसळून दुर्घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!