उद्रेक न्युज वृत्त
कुरखेडा(गडचिरोली) :- सध्याच्या घडीला गडचिरोली जिल्ह्यातील काही तंटामुक्त समित्या सोडल्या तर उर्वरित गावातील तंटामुक्त समित्या हे केवळ कागदोपत्री तसेच नामधारी असल्याच्या लक्षात येत आहेत.काही प्रकरणे अंगलट येणार,म्हणून निर्णय घेण्यास पुढे धजावित नाही.काही तंटामुक्त समितीचे पदाधिकारी म्हणतात की,आम्ही भानगडीत कशाला पडू? आम्हाला काय मिळते? ‘आम्ही बिन पगारी अन् फुल्ल अधिकारी’ असल्याने गावातील तंटेच मिटविण्यात असमर्थता दर्शवली आहे.मात्र,या सर्वांना अपवाद असलेली तंटामुक्त समिती ती म्हणजे कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील तंटामुक्त समिती आजही गावातील तंटे वा इतरांना न्याय मिळवून देण्याचे काम करीत आहे.अशातच तीन दिवसांपूर्वी बाहेर ठिकाणच्या प्रेमीयुुगुलांचे विवाह लावून दिले आहे.कुरखेडा तालुक्यातील गेवर्धा येथील तंटामुक्त गाव समितीच्या पुढाकाराने प्रेमीयुगुल विवाहबद्ध झाले.विजय सुभाष कामडे रा.चनकापूर ता.सावनेर जि. नागपुर आणि रविना रवींद्र तायवाडे रा.पोटा ता. सावनेर जि.नागपुर यांचे मागील एक वर्षांपासून प्रेमसंबंध होते.जवळपास ३ महिन्यापूर्वी पासुन विजय हा राजलक्ष्मी इंटरप्राईजेस कंपनी गेवर्धा या ठिकाणी चालक म्हणून काम करीत आहे.दोघांनी तंटामुक्त समिती पदाधिकारी ग्राम पंचायत गेवर्धा यांची भेट घेऊन लग्न लावून देण्याची विनंती केली.तंटामुक्त समितीने यासंदर्भात निर्णय घेऊन सोमवारी,दिनांक-३ जून रोजी तंटामुक्त समिती पदाधिकारी व गावकऱ्यांच्या उपस्थितीत दोघांचा विवाह पार पाडण्यात आला.विवाह प्रसंगी तंटामुक्त समिती अध्यक्ष राजु बारई,ग्राम पंचायत सदस्य रोशन सय्यद,ग्राम पंचायत सदस्य कल्पना कांबळे,पोलिस पाटील भाग्यरेखा वझाडे,ग्रामकोष अध्यक्ष राजेंद्र कुमरे, तंटामुक्ती सदस्य सुधीर बाळबुद्धे, योगेश गायकवाड,ताहीर शेख,योगेश नखाते,भुवनेश्वर कांबळे,महिला ग्रामसंघाचे अध्यक्ष हिना पठाण, शांतीदेवी पालीवाल,प्राजक्ता कोसरे,कुसुम मस्के,लता डोंगरवार,ग्रापं कर्मचारी कृष्णा मस्के,अमिता नाहामूर्ते आदी उपस्थित होते.

