Tuesday, August 25, 2026
Homeमुंबईअजब-गजब कारनामा…! अन् 'त्याने' व्हॉट्स ॲपवरच दिला तिहेरी तलाक…

अजब-गजब कारनामा…! अन् ‘त्याने’ व्हॉट्स ॲपवरच दिला तिहेरी तलाक…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- हल्ली मोठ्या प्रमाणावर व्हॉट्स ॲप चा ट्रेण्ड सगळीकडेच वाढलेला दिसून येतो.लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत ‘व्हॉट्स ॲप की दुनिया’ असे झाले आहे.याच्या माध्यमातून कुणी प्रेमाच्या आणा भाका टाकतात तर कुणी वेगवेगळी अजब-गजब कारनामे करू पाहतात.असाच अजब-गजब कारणाम्याचा प्रकार उघडकीस आला आहे.लग्नाच्या सहा महिन्यांत पत्नीला तिहेरी तलाक देणाऱ्या अफनान कय्युम पटेल या पतीविरुद्ध मालवणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.विवाहीत असताना दुसऱ्या तरुणीशी प्रेमसंबंध ठेवून पत्नीला व्हॉट्स ॲपवर तिहेरी तलाक दिल्याचा अफनानवर आरोप आहे.

जोगेश्वरी येथे राहणाऱ्या २१ वर्षांच्या तक्रारदार तरुणीचे गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यांत अफनानसोबत लग्न झाले होते.लग्नानंतर ती मालाडच्या मालवणीतील सासरी राहण्यासाठी आली होती. लग्नाच्या एका आठवड्यात तिला तिच्या पतीचे दुसऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समजले होते.याच कारणावरुन त्यांच्यात सतत खटके उडत होते.काही दिवसांपूर्वी चॅटदरम्यान त्याने तिला तिहेरी तलाकचा मॅसेज पाठवून तिच्याशी असलेले सर्व संबंध तोडून टाकले होते.हा प्रकार तिच्या माहेरी समजताच तिच्या पालकांनी अफनानची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.मात्र त्याने तिचे दुसऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध असून तिच्याशी लग्न करायचे आहे; असे सांगून तिला पुन्हा तिहेरी तलाक देत घरातून जाण्यास सांगितले होते.या प्रकारामुळे त्यांना प्रचंड मानसिक धक्का बसला होता.त्यामुळे तिने अफनानविरुद्ध मालवणी पोलिसांत तक्रार केली होती.या तक्रारीची शहानिशा केल्यांनतर त्याच्याविरुद्ध पोलिसांनी भादवीसह मुस्लिम विवाह कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

रोजगारनिर्मितीला चालना..! तब्बल १ कोटी ५९ लाख रुपयांच्या निधीतून उभारण्यात आलेल्या ‘प्रगत काष्ठ प्रक्रिया व प्रशिक्षण केंद्रा’चे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील समृद्ध वनसंपत्तीचा सुयोग्य वापर करून स्थानिक पातळीवर मूल्यवर्धन करणे तसेच महिलांना आधुनिक काष्ठकलेचे व्यावसायिक प्रशिक्षण देऊन रोजगार व स्वयंरोजगाराच्या शाश्वत...

तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ कासवांचे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात पुनर्वसन..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वन्यजीवांची तस्करी करणाऱ्या तस्करांच्या तावडीतून सुटलेल्या तब्बल २१६ भारतीय तारांकित (स्टार)कासवांना महाराष्ट्र वनविभाग आणि 'रेस्क्यूईक असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर' अर्थात 'रॉ'...

बीअर बारचा परवाना देण्यासाठी पैश्याची लालच; अधिकारी एसीबीच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बीअर बारचा परवाना देण्यासाठी आठ लाख रुपयांच्या लाचेच्या रकमेची मागणी करून तब्बल अडीच लाख रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या(एसीबी)नागपूर पथकाने...

अचानक समोर आलेल्या कारला दुचाकीची धडक; तरुणाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शहरात भीषण अपघाताची घटना घडून एका २० वर्षीय दुचाकी चालक तरुणाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला; तर सहकारी तरुण गंभीर जखमी झाल्याची...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!