उद्रेक न्युज वृत्त
कोरची(गडचिरोली) :- घरगुती वादाचा राग मनात ठेऊन राहत्या घरात झोपून असलेल्या पत्नीच्या मानेवर कुऱ्हाडीने सपासप तीन वेळा वार करून पत्नीची हत्या केल्याची घटना कोरची तालुका मुख्यालयापासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या बेतकाठी येथे बुधवारी २९ मे रोजी पहाटे ३ वाजता दरम्यान घडली होती.या प्रकरणातील आरोपी रोहिदास बिरसिंग बंजारा (४०) रा.बेतकाठी याला ३ दिवस पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.
अमरोतीन रोहिदास बंजारा (३३) रा.बेतकाठी असे मृतक पत्नीचे नाव आहे.बुधवारच्या पहाटे पत्नीला कुऱ्हाडीने ठार केल्यानंतर त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले होते.त्याला न्यायालयापुढे उभे केले असता न्यायालयाने ३ दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे.पुढील तपास ठाणेदार चंद्रकांत वाबळे हे करीत आहेत.

