Saturday, October 3, 2026
Homeकोंढाळाग्रामपंचायत कोंढाळा तर्फे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा…

ग्रामपंचायत कोंढाळा तर्फे जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

कोंढाळा(गडचिरोली) :- जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिनाचे औचित्य साधून आज दिनांक- २८ मे रोजी कोंढाळा ग्रामपंचायतीच्या सभागृहात दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास सरपंचा अपर्णा राऊत,ग्रामसेविका मेघा राऊत,मुक्तिपथच्या भारती उपाध्याय,सदस्या भूनेश्र्वरी गुरनुले,आशा वर्कर,महिला मान्यवर तसेच गावातील ६० किशोरवयीन मुलींच्या प्रमुख उपस्थितीत जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करण्यात आला.

गेली चार वर्षांपासून जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन ग्रामपंचायत कोंढाळाच्या उच्च शिक्षित सरपंचा अपर्णा नितीन राऊत यांच्या पुढाकाराने साजरा करण्यात येतो.जागतिक मासिक पाळी स्वच्छता दिन साजरा करण्या मागचे मुख्य कारण म्हणजे मासिक पाळीबाबत स्वच्छता राखणे आणि त्यासंबंधीचे गैरसमज दूर करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.सध्याची किशोरवयीन पिढी ही ‘फास्ट फूड’ प्रमाणे जलद गतीने चालणारी आहे.लहान वयात असतांनाच पळून जाण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे.मात्र,आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही केवळ खेड्यातच नाही तर शहरांमध्ये राहणाऱ्या अनेक महिलांना मासिक पाळीशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टींच्या माहितीची जाण नसते. यामुळे अनेक ठिकाणी विटाळ मानून अंधश्रद्धा  अजूनही बाळगली जाते.खरं तर वयाच्या १६ किंवा १७ व्या वर्षी मुलींना मासिक पाळी येते.मासिक पाळी आल्यानंतर महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. हे बदल होत असताना अनेक महिलांना मानसिक आणि शारीरिक समस्यांना सामोरे जावे लागते. मासिक पाळीच्या वेळी स्वच्छता कशी पाळावी?यासाठी आज जवळपास गावातील ६० महिला आणि किशोरवयीन मुलींना मार्गदर्शन करण्यात आले.तसेच मासिक पाळी आल्यानंतर घ्यावयाची काळजी,पाळी येण्याअगोदर आणि नंतर आपल्या शरीरात होणारे बदल, मानसिकतेत होणारे बदल व आजार याबद्दल माहिती देण्यात आली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धावत्या पिकअप वाहनाचा अपघात; नऊ जण गंभीर जखमी,तर आठ जण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त :-पोटाची खळगी भरण्यासाठी बाहेर जिल्ह्यात निघालेल्या मजुरांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना आज,शनिवार ३ ऑक्टोंबर रोजी पहाटेच्या सुमारास अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर पोलिस...

काँग्रेसकडून विधान परिषद निवडणुकीसाठी तीन उमेदवारांची घोषणा.. -नागपूर पदवीधर मतदार संघासाठी अभिजीत वंजारी यांना पुन्हा एकदा उमेदवारी जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषदेच्या तीन पदवीधर आणि दोन शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीची अधिकृत घोषणा  केली.यामध्ये नागपूर पदवीधर...

राहत्या घरातच सुरू होता देहव्यापाराचा अड्डा; पोलिसांची धाड.. – दोन पिडीत महिलांची सुटका,तर दोन महिलांना अटक..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-राहत्या घरात देहव्यापाराचा अड्डा चालवणाऱ्या दोन महिलांना अटक करण्यात चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास यश आले आहे.या प्रकरणी घटनास्थळावरून आरोपींच्या ताब्यातून...

संशयाच्या भुताने झपाटलेल्या पतीने केली पत्नीची हत्या; शवविच्छेदन अहवालात फुटले बिंग..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-संशयाचा भूत भल्या-भल्यांना नरकात धाडत असतो.तो एकदा कां अंगात शिरला,तर कधी काय होणार हे सांगणे अवघड आहे.अश्याच प्रकारे संशयाच्या भुताने झपाटलेल्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!