Sunday, April 19, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसोन्याची शुद्धता कशी ओळखावी? -२२ आणि २४ कॅरेटमध्ये फरक काय?

सोन्याची शुद्धता कशी ओळखावी? -२२ आणि २४ कॅरेटमध्ये फरक काय?

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :- आपण कधी ना कधी सोने खरेदी करतोच.सोने हे नगदी तात्काळ पैसा मिळवून देणारे एक उत्तम पर्याय आहे.मात्र,आपण खरेदी केलेले सोने खरे की खोटे? त्याची शुद्धता कशी ओळखावी?सोने खरेदी करताना लोकांनी त्याची गुणवत्ता लक्षात घेतली पाहिजे. ग्राहकांनी हॉलमार्क चिन्ह पाहूनच खरेदी करावी. हॉलमार्क ही सोन्याची सरकारी हमी आहे; ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स (BIS) हॉलमार्क ठरवते.हॉलमार्किंग योजना ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ॲक्ट, नियमांनुसार चालते.सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात.२४ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांवर ९९९,२३ कॅरेटवर ९५८,२२ कॅरेटवर ९१६,२१ कॅरेटवर ८७५ आणि १८ कॅरेटवर ७५० असे लिहिलेले असते.बहुतेक सोने २२ कॅरेटमध्ये विकले जाते.तर काही लोक १८ कॅरेट देखील वापरतात.

२२ आणि २४ कॅरेटमध्ये काय फरक आहे?👇

२४ कॅरेट सोने ९९.९% शुद्ध आणि २२ कॅरेट सोने अंदाजे ९१ टक्के शुद्ध आहे.२२ कॅरेट सोन्यात तांबे, चांदी,जस्त यासारखे ९% इतर धातू मिसळून दागिने तयार केले जातात.२४ कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्यापासून दागिने बनवता येत नाही.त्यामुळे बहुतांश दुकानदार २२ कॅरेटमध्ये सोने विकतात.

मिस्ड कॉलवरून किंमत घ्या जाणून👇

२२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या दागिन्यांचे किरकोळ दर जाणून घेण्यासाठी,तुम्ही ८९५५६६४४३३ वर मिस कॉल करू शकता.काही वेळात एसएमएसद्वारे दर उपलब्ध होतील.याशिवाय, सतत अपडेट्सच्या माहितीसाठी तुम्ही www.ibja.co किंवा ibjarates.com ला भेट देऊ शकता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विद्यार्थ्यांची सुरक्षितता महत्त्वाची; सर्व शैक्षणिक संस्था सकाळच्या सत्रात सुरू ठेवण्याचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अश्यातच चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाची...

चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच उडाला भडका; पतीचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-स्वयंपाकघरातील गॅस लिकेज असल्याने चहा बनवण्यासाठी गॅस पेटवणार तितक्याच आगीचा अचानकपणे भडका उडाला आणि काही क्षणातच सिलिंडरचा जोरदार स्फोट झाला.दरम्यान,संपूर्ण घरात...

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!