Thursday, October 1, 2026
Homeगोंदियामोठी बातमी; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंद न करण्याकरिता घेतली ८ हजारांची लाच…-सहाय्यक...

मोठी बातमी; ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंद न करण्याकरिता घेतली ८ हजारांची लाच…-सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गोंदिया :- ट्रॅक्टर चालकावर गुन्हा नोंद न करण्याकरिता १० हजार रुपयांची लाच मागणाऱ्या सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाला तडजोडी अंती ८ हजार रुपयाची लाच स्वीकारताना गोंदिया लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आज,दिनांक- २६ मे रोजी रंगेहाथ पकडले.अनिल फागुजी पारधी वय ५४ वर्षे,रा.श्रीनगर,गोंदिया असे लाचखोर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,तक्रारदार हे ट्रॅक्टर चालक असून त्यांच्या विरुद्ध गोंदिया शहर पोलीस ठाण्यात एका प्रकरणात तोंडी तक्रार करण्यात आली होती.तक्रार तोंडी असल्याने याबाबत कळू शकले नाही.दरम्यान गुन्हा दाखल न करण्याकरीता व तक्रारदार व गैरअर्जदार यांच्यात समझोता करून देण्याच्या मोबदल्यात आरोपी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक यांनी तक्रारदार यांच्याकडे १० हजार रुपयांची लाच मागितली.मात्र,त्यांना लाच द्यायची नसल्याने त्यांनी २४ मे रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग गोंदिया येथे तक्रार दाखल केली.यावर पडताळणीदरम्यान आरोपी अनिल पारधी याने १० हजार रुपये लाच रकमेची मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

दरम्यान,सापळा कारवाई केली असता त्यास पंचा समक्ष ८ हजार रुपये लाच रक्कम स्वीकारताना अटक करण्यात आली.प्रकरणी गोंदिया शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर परिक्षेत्र,पोलीस अधीक्षक राहुल माकणीकर, अपर पोलीस अधीक्षक सचीन कदम,संजय पुरंदरे,गोंदियाचे पोलीस उपअधीक्षक पर्यवेक्षक अधिकारी विलास काळे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अतुल तवाड़े,सहायक फौजदार चंद्रकांत करपे,पोलिस हवालदार संजयकुमार बोहरे,मंगेश काहालकर,नायक पोलीस शिपाई संतोष शेंडे, संतोष बोपचे, अशोक कापसे, प्रशांत सोनवणे,काटकर, रोहिणी डांगे,चालक नापोशि दिपक बाटबर्वे यांनी केली.

जिल्ह्यात लाचखोरीच्या प्रमाणात वाढ झाल्याचे चित्र असून लाच लुचपत प्रतिबंधक विभागाची महिनाभरातील ही तिसरी कारवाई आहे. विशेष म्हणजे यापूर्वीच महिन्याच्या सुरुवातीलाच ७ मे रोजी गोरेगाव येथील तहसीलदार, नायब तहसीलदारासह एका खाजगी व्यक्तीला लाच घेताना पकडण्यात आले होते. तर १४ मे रोजी जिल्ह्यातील सडक अर्जुनी येथील नगरपंचायतीचे मुख्याधिकारी, नगराध्यक्ष व नगरसेवकांसह ६ जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आज पुन्हा पोलीस विभागातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर उद्या होणारा व्यापारी संघटनांचा ‘नो यूपीआय डे’ मागे..!

उद्रेक न्युज वृत्त :-यूपीआय व्यवहारांवर मर्चेंट डिस्काउंट रेट(MDR)लागू करण्याच्या हालचाली सुरू झाल्याने या प्रस्तावित निर्णयाविरोधात व्यापारी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला होता.या निर्णयाचा तीव्र निषेध...

उपविभागीय अभियंता बाळू षटगोपनवार यांचा निरोप समारंभ..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-सार्वजनिक बांधकाम विभाग, सिंदेवाहीचे उपविभागीय अभियंता बाळू जगन्नाथ षटगोपनवार यांच्या सेवापूर्ती निमित्त निरोप समारंभ आज गुरुवारी उत्साहात पार पडला.यावेळी षटगोपनवार यांचा...

गडचिरोलीत गर्भाशयमुखाचा कर्करोग रोखण्यासाठी एचपीव्ही लसीकरण; १ हजार २५४ किशोरवयीन मुलींना दिली लस..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गर्भाशयमुखाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी गडचिरोली जिल्ह्यात शंभर टक्के एचपीव्ही लसीकरण करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतला आहे.या उद्दिष्टाच्या पूर्ततेसाठी आदिवासी व...

आजपासून रेल्वेने प्रवास करणाऱ्या ‘या’ प्रवाशांना एक ओळखपत्र सोबत बाळगणे अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वे प्रशासनाने मोठा कडक निर्णय घेत 'आरक्षित' केलेल्या तिकिटांवर किंवा 'ई-पास'वर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आज,गुरुवार १ ऑक्टोंबरपासून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!