उद्रेक न्युज वृत्त
अहमदनगर :-अंगणात खेळत असताना बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये तीन वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अहमदनगरच्या राहुरी तालुक्यातील वरवंडी येथे घडली.वेदिका श्रीकांत ढगे असे चिमुकलीचे नाव आहे.या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
काल,वेदिका ढगे ही चिमुकली आपल्या घराच्या अंगणात खेळत होती.यावेळी गिन्नी गवतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने तिच्यावर हल्ला केला.या हल्ल्यामध्ये वेदिका गंभीर जखमी झाली होती.तिच्यावर नगर येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. आज, उपचादारम्यानच तिचा मृत्यू झाला.या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.भरवस्तीत बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले असून बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे.
दरम्यान, अमरावती शहरातही बिबट्याचा वावर आढळून आला आहे.अमरावती शहरातील कव्हरधाम जवळ बिबट्याने श्वानाची शिकार केली.ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.तसेच मध्यरात्री १ ते दीड वाजता दरम्यान बिबट्याचा मुक्त संचार होता.परिसरात बिबट्याचा मुक्त वावर असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

