Wednesday, October 21, 2026
Homeदेसाईगंजपीक पंचनामे झाले,याद्याही तयार झाल्या; मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच मिळेना…!-देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांची...

पीक पंचनामे झाले,याद्याही तयार झाल्या; मात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच मिळेना…!-देसाईगंज तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रतीक्षा आजही कायम…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुख्य संपादक/सत्यवान रामटेके 

देसाईगंज(गडचिरोली) :- मागील वर्षी ऑगष्ट, सप्टेंबर महिन्यात कृत्रिमरित्या वैनगंगा नदीला आलेल्या पुराने  शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत धान पिकाची नासाडी झाली.त्यानंतर पंचनामेही झाले; याद्याही तयार झाल्या; परंतु अटी व शर्तीच्या कचाट्यात नऊ महिन्यांचा काळ लोटला असला तरी देसाईगंज तालुक्यातील कुरुड,कोंढाळा,विर्शि, आमगाव,सावंगी व इतर गावातील पूरबाधित शेतकऱ्यांना आर्थिक लाभ मिळालेला नाही.

अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीनांही मदतीची हाक दिली; पण आश्वासनाशिवाय काहीच मिळालेले नाही.ऑगष्ट,सप्टेंबर २०२३ मध्ये अतिवृष्टी झाली होती. सततच्या पावसामुळे नदी,नाल्यांना पूर आल्यामुळे तालुक्यातील बऱ्याच गावासह परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पाणी शिरून धान पिकासह इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या बाबीला आता ९ महिन्यांचा कालावधी निघूनही त्यांना मोबदला मिळालेला नाही. त्यामुळे पूर पीडित शेतकऱ्यांना नुकसानभरपाईची प्रतीक्षा आजही कायम आहे.शासन-प्रशासनाने याची दखल घेऊन नुकसानभरपाई देण्यात यावी; अशी मागणी अनेकांनी केली होती.मात्र,त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.पुरामुळे गर्भावस्थेत असलेले धानाचे पीक पूर्णतः उद्धवस्त झाले.जवळपास ७६४.०३ हेक्टर क्षेत्रातील धानाची नासाडी झाली होती.याचा अनेक शेतकऱ्यांना फटका बसला. अतिवृष्टी झाल्याने धरणातील पाणी वैनगंगा नदीला सोडण्यात आले होते.त्यामुळे मोठा पूर आला. पुरामुळे अनेक गावांतील शेतात पाणी शिरून खरीप हंगामातील धानासह इतर पिकांचे नुकसान झाले. तसेच धानावर गढूळ पाणी व धान पाखर झाल्याने मोठे नुकसान झाले.नुकसान होऊनही भरपाई केव्हा मिळणार? याकडे शेतकरी बांधव टक लावून वाट बघत आहेत.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

चुडाराम बल्हारपुरे यांच्या ‘जत्रा घडली नागोबाची’ लोकनाट्यास सातवा राज्यस्तरीय पुरस्कार.. – मुंबई येथे होणार सत्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दत्तात्रय कृष्ण सांडू प्रतिष्ठान,चेंबूर(मुंबई) या संस्थेतर्फे दरवर्षी मराठी साहित्यिकांसाठी राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड्.मय स्पर्धा घेण्यात येते व पुरस्कारप्राप्त साहित्यिकांना प्रतिष्ठानच्या वार्षिक साहित्य...

जेवणातून विषबाधा; शेकडो नागरिक रुग्णालयात..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील खराशी गावात दुर्गोत्सवाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.अनेक नागरिकांना उलट्या,मळमळ आणि जुलाबाचा त्रास जाणवू लागल्याने...

उद्याला ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ अंतर्गत जनजागृती सत्राचे आयोजन.. – विद्यार्थी व नवउद्योजकांनी लाभ घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्ण विचार, सर्जनशीलता,समस्या निवारणाची क्षमता आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य,रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत ‘सेवा फर्स्ट इनोव्हेशन चॅलेंज...

आंघोळीसाठी तलावात उडी; दोघेजण बचावले..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या अंबाझरी तलावात आंघोळीसाठी उडी मारलेले दोन युवक बुडता-बुडता बचावले.विशेष म्हणजे,धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्य आपत्ती प्रतिसाद दलाची एक टीम नागरिकांच्या सुरक्षेसाठी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!