Sunday, May 3, 2026
Homeमुंबईएका पदासाठी एकच अर्ज ग्राह्य…-पोलीस भरतीसाठी जास्त अर्ज केल्यास द्यावे लागणार हमीपत्र…

एका पदासाठी एकच अर्ज ग्राह्य…-पोलीस भरतीसाठी जास्त अर्ज केल्यास द्यावे लागणार हमीपत्र…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :- पोलिस भरती २०२२-२३ मध्ये अनेक उमेदवारांनी एकापेक्षा जास्त अर्ज दाखल केलेले आहेत.एका पदासाठी एकच अर्ज दाखल करणे आवश्यक असताना अनेकांनी एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज केल्याचे निदर्शनास आलेले आहे. त्यामुळे अशा उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेण्यात येणार आहे.

विशेष पोलिस महानिरीक्षक प्रवीणकुमार पडवळ यांनी काढलेल्या नोटिशीमध्ये म्हटले की,सन २०२२-२३ पोलिस शिपाई भरतीमध्ये एकाच पदासाठी विविध घटकात एकापेक्षा जास्त आवेदन अर्ज सादर केले आहेत.त्यामुळे त्या उमेदवारांनी त्यांच्या वास्तव्याच्या जिल्ह्यातील पत्त्यानुसार यादी तपासून हमीपत्र सादर करावेत. उमेदवारांचा एका पदासाठी एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येणार आहे.त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील पोलिस कार्यालयामध्ये उमेदवारांना समक्ष हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.एका पदासाठी एकच अर्ज ग्राह्य असून अनेक अर्ज केल्याची माहिती कार्यालयाने द्यावी व एकच अर्ज ग्राह्य धरण्यात येईल, अशी समज द्यावी असे आदेशामध्ये म्हटले आहे.सर्व जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांना तसे आदेश देण्यात आलेले आहेत.याद्वारे उमेदवारांकडून हमीपत्र लिहून घेऊन ज्या घटकासाठी अर्ज करावयाचा आहे त्याचा तपशील त्या मागवला आहे.सदर माहिती १७ मे २०२४ पर्यंत पाठवण्याचे नोटिशीमध्ये म्हटले आहे.त्यामुळे उमेदवारांना याबाबतचे हमीपत्र द्यावे लागणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

२४ वर्षीय तरुणाचा आढळला मृतदेह; गडचिरोली शहरात खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-एका २४ वर्षीय तरुणाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आल्याने गडचिरोली शहरात एकच खळबळ उडाली आहे.सदरची घटना गडचिरोली शहराच्या धानोरा मार्गावरील शिवाजी...

आता कुरखेडा व परिसरातील मूत्रपिंड विकारग्रस्त रुग्णांना वेळेवर व दर्जेदार मिळणार उपचार.. “महाडायलिसिस” अंतर्गत कुरखेडा येथे अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक आरोग्य विभाग,महाराष्ट्र शासन यांच्या “महाडायलिसिस-स्वस्थ आरोग्याची हमी” या महत्वाकांक्षी उपक्रमांतर्गत कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात अत्याधुनिक डायलिसिस केंद्राचे लोकार्पण उत्साहात पार पडले.या...

अचानकपणे रानडुकरांचा कळप मार्गावर आला; धाडकन दोन दुचाक्या धडकल्या.. – तिघेजण गंभीर जखमी,तर एकजण किरकोळ जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-दुचाकीने निघालेल्या गावापासून काही अंतरावरील मार्गावर अचानकपणे रानडुकरांचा कळप आडवा आल्याने झालेल्या अपघातात तिघेजण गंभीर जखमी झाले,तर एकजण किरकोळ जखमी झाल्याची...

सौर विद्युत कुंपण योजना ही शेतकऱ्यांच्या हिताचीच; उधळपट्टीचे आरोप निराधार- कृषी विभागाचे स्पष्टीकरण

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतून राबविण्यात येत असलेल्या सौर विद्युत कुंपण योजनेबाबत प्रसिद्ध झालेल्या बातम्यांतील आरोप वस्तुस्थितीला धरून नसून दिशाभूल करणारे आहेत.ही...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!