Friday, October 16, 2026
Homeदेसाईगंजडॉ.नामदेवराव किरसान यांच्या देसाईगंज प्रचार कार्यालयाचे उद्घाटन….-इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना शेवट पर्यंत लढायचे...

डॉ.नामदेवराव किरसान यांच्या देसाईगंज प्रचार कार्यालयाचे उद्घाटन….-इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना शेवट पर्यंत लढायचे आहे…रोहित पवार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

देसाईगंज(गडचिरोली) :- भारतीय राष्ट्रीय काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार गट)- शिवसेना(उबाठा गट)- अखिल भारतीय रीपबलिकान पार्टी – रिपब्लिकन पार्टी(खोरीपा)- शेकाप-भारतीय कम्युनिस्ट पार्टी-समाजवादी पार्टी-मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष-आम आदमी पक्ष व इंडिया आघाडीचे गडचिरोली-चिमूर लोकसभा खेत्राचे अधिकृत उमेदवार डॉ.नामदेवराव किरसान यांच्या देसाईगंज प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी आमदार आनंदराव गेडाम तसेच विविध इंडिया आघाडीचे पदाधिकारी,मान्यवर व कार्यकर्त्यांच्या हस्ते आज दिनांक- ३ एप्रिल रोजी प्रचार कार्यालयाचे उद्घाटन  करण्यात आले.

कर्जत जामखेड विधानसभा क्षेत्राचे आमदार रोहित  पवार यांचे देसाईगंज नगरीमध्ये आगमन झाल्यानंतर पवार यांनी इंडिया आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना शेवट पर्यंत लढायचे आहे व केवळ लढणे ही आपली बाजू नसून जिंकण्यासाठी लढायचे आहे.भावी खासदार आपलाच असणार असून अजून लढाई संपली नाही. अहंकारी पक्षाला गुडघ्यावर आणायचे आहे.असे त्यांनी म्हटले आहे.

महत्वाचे म्हणजे,लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजताच विरोधी पक्षातील सर्व जण एकत्र आले आहेत.उद्घाटन प्रसंगी आनंदराव गेडाम म्हणाले की, किरसान हे गोर गरिबांसाठी झटणारे नेते आहेत. सगळीकडेच सर्वसामान्य जनतेमध्ये जात आहेत. सगळ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे.एकसंघता असणे आवश्यक आहे.शेवटच्या स्तरावर आपण कमी पडू नये; बूथ नियोजन चांगले करावे; व इंडिया आघाडीचे उमेदवार बाहेरचे नाहीत.हेही तितकेच खरे आहे.

देसाईगंज काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले यांनी प्रास्ताविक प्रसंगी म्हटले की,इंडिया आघाडीच्या वतीने आपण सर्वजण एकत्र आलेले असल्याने आपला विजय नक्कीच होणार आहे.मात्र सर्वांनी एकजुटीने कार्य करणे; तितकेच महत्त्वाचे आहे.

उपस्थित प्रचार कार्यालयाचे उद्घाटन प्रसंगी माझी जिल्हा परिषद सदस्य डॉ.विनोद नाकाडे,माजी जिल्हा परिषद सदस्य दिगंबर मेश्राम,राजु रासेकर, मोटवानी,जमाल भाई शेख,बबन नाकाडे विलास बनसोड, विलास ठाकरे शिवसेना उप तालुका प्रमुख,आम आदमी पक्षाचे प्रकाश जीवानी,विठ्ल ढोरे,अरुण भाऊ कुंभलवार,संदीप वाघाडे,लीलाधर भर्रे,निलोफर ताई,ममता पेंदाम,मनोज ढोरे,आरती ताई,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते श्याम धाईत परसराम टिकले,माजी जिल्हा परिषद सदस्य अमोल मारकवार,सागर वाढई,ओम शर्मा,अशोक माडावार, रामदास मसराम साजिक कार्यकर्ते,समाजवादी पक्षाचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष इलियास खान,नितीन भाऊ राऊत,पिंकू भाऊ बावणे,आनंद चावला, मनोहर निमजे,अविनाश गेडाम,रोशन शेंडे,मोहित अत्रे व इंडिया आघाडीचे सर्व उपस्थित मान्यवर पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

देसाईगंजच्या आदर्श महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी रोजगाराभिमुख मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-विद्यार्थ्यांना पारंपरिक शिक्षणासोबतच व्यावसायिक ज्ञान,कौशल्ये आणि स्वयंरोजगाराच्या संधींची माहिती मिळावी,या उद्देशाने आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथील वाणिज्य व व्यवस्थापन विभागांतर्गत...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!