Thursday, August 27, 2026
Homeभंडारामोहफुल गोळा करणे बेतले जीवावर; वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

मोहफुल गोळा करणे बेतले जीवावर; वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

भंडारा :- पवनी तालुक्यातील कन्हाळगाव येथे मोहफूल गोळा करायला जंगलात गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार झाली असल्याची घटना काल, सोमवारी २५ मार्च रोजी पहाटे उघडकीस आली.सिताबाई श्रावण डडमल वय ६० वर्षे रा.कन्हाळगाव असे मृत महिलेचे नाव आहे.

सिताबाई डडमल या चन्नेवाडा कक्ष क्र. ३१६ मध्ये पहाटेच्या सुमारास मोहफुल गोळा करायला गेल्या होत्या.दुपारी पर्यंत घरी परत न आल्यामुळे घरातील व्यक्तींनी शोधाशोध केली.गावातील स्मशानभूमीपासून पाचशे मीटरवर जंगलात मृत अवस्थेत त्या आढळून आल्या.सदर घटनेची माहिती वन विभाग व पोलीस

विभागाला देण्यात आली.घटनास्थळी गावकऱ्यांनी मृतदेह उचलण्यास मज्जाव केल्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढून मृतदेह शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय पवनी येथे आणला.यावेळी गावकऱ्यांनी वाघाला जेरबंद करून इतरत्र सोडण्यात यावे; अशी मागणी केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; दीड हजार खात्यात येण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच 'मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण' योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने मोठा निर्णय घेत मागील जुलै महिन्याच्या प्रलंबित...

उद्याला राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले गडचिरोली दौऱ्यावर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळून)शिवेंद्रराजे भोंसले हे उद्या,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या दौऱ्यात ते जिल्ह्यातील...

बापरे..! स्मशानभूमीत रात्रीच्या अंधारात अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार.. -मांत्रिक पळाला घटनास्थळावरून..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कुही तालुक्यात एका अघोरी पूजेचा धक्कादायक प्रकार गाव नजीकच्या स्मशानभूमीत उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आलेल्या...

कुरखेडा शहरात पैगंबर जन्मोत्सव विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-इस्लाम धर्माचे प्रवर्तक प्रेषीत मोहम्मद पैगंबर यांची १५०१ वी जयंती आज,बुधवार २६ ऑगस्ट रोजी कुरखेडा शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित उत्साहात साजरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!