उद्रेक न्युज वृत्त
संपादक/मुनिश्वर बोरकर
गडचिरोली :- गडचिरोली व अहेरी डेपोच्या भंगार गाडयाने प्रवासी त्रासले आहेत.कधि गाडीचे टप्पर उडते तर पावसाळ्यात टपरातून पाणी गळते हे नेहमीचेच झाले असतांना आज दिनांक- १ मार्च ला सकाळी सात वाजताच्या सुमारास गडचिरोली आगाराची बस परतीच्या प्रवासात भर जंगलात पेट घेतल्यामुळे प्रवाशांची एकच तारांबळ उडाली. गडचिरोली आगाराची बस मुलचेरा येथे हल्टिंग राहते. ती आज सकाळी परतीच्या प्रवासात घोट मार्गे सकाळीच निघाली असता भर जंगलात पेट घेतल्यामुळे प्रवासी घाबरले.चालकांनी सावधानता बाळगुन प्रवाश्यांना खाली उतरविले. त्यामुळे प्रवासी सुखरूप बचावले.एम एच ०७ सी ९३१६ क्रमांकाची बस ७ ते ८ प्रवाशी घेऊन गडचिरोली कडे निघाली होती.वाटेत घोट जंगल परिसरात एस.टी च्या इंजीनमधुन धुर निघताच ड्रायव्हर च्या लक्षात आले. त्यांनी बस थाबवून प्रवाशांना उतरविले व झाड्याच्या फांदीने आग विझविण्याचा प्रयत्न केला.परंतु इंजिन व समोरचा भाग जळून खाक झाला.गडचिरोली आगाराचे व्यवस्थापक यांना या विषयी विचारणा केली असता गाडीतील ब्यॉटरी मुळे बस जळाली मात्र प्रवासी सुखरूप आहेत.दुसऱ्या बस ची व्यवस्था केल्याचे सांगीतले.गडचिरोली आगारातील अश्या भंगार बस बंद कराव्या; अशी मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.

