उद्रेक न्युज वृत्त
गडचिरोली :- मनात जिद्दआणि चिकाटी असेल तर प्रत्तेक उंच असलेला शिखरही गाठता येतो.असाच उंच शिखर जिद्द आणि चिकाटीच्या बळावर कुरखेडा तालुक्याच्या सावलखेडा येथील तरुणाने गाठलेला आहे.नक्षलग्रस्त,अतिदुर्गम आणि मागास म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यात देशेसेवेचे व्रत धरनारे अनेक तरूण-तरूणी आहेत.अश्यातच कुरखेडा तालुक्यातील सावलखेडा या छोट्याश्या गावातील अनीष शंकर दोनाडकर सुद्धा त्यापैकी एक असून वर्दि विषयी लहानपणापासून आकर्षण आणि प्रेम बाळगणारा तरूण,गेल्या पाच ते सहा वर्षांपासून वर्दिसाठी मेहनत घेत होता.कधी परिक्षेत एक-दोन गूणांनी तर कधी शारीरीक चाचणीत सेकंदांनी स्वप्न पूर्ण होण्यापासून परत दुर जायचा; वर्ष २०१५ आणि २०१६ मध्ये आर्मी जीडी भरतीमध्ये उंची मुळे तर २०१७ -१८ मध्ये आर्मी क्लर्क भरतीत फक्त काही गुणांनी पेपर राहीला.२०१८ ला होमगार्ड म्हणून निवड झाली.परंतु काही कारणास्तव भरती रद्द झाल्याने
२०१९ मध्ये जिडी भरतीत परत उंचीमुळे हार पत्करावी लागली. २०१९ मधे एस आरपीएफ ला ९ गुणांनी अंतीम यादितून नाव चुकला.२०१९ मध्ये पोलिस चाचणीत ३ कमी गुणांमुळे परत स्वप्न पूर्ण झाले नाही.परंतु दिवस उजाडला आणि शेवटी अपयशाच्या अनेक पायऱ्या चढल्यावर २०२१ मध्ये पोलिस काॅंस्टेबल पदी निवड झाली.घरची परिस्थिती हलाखीची असतांना स्वप्न आणि परिवार दोन्ही एकाच वयात सांभाळण्याची जबाबदारी तरूणांवर येत असल्यामुळे स्वप्न की पारिवारिक जबाबदारी अश्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागले.क्लासेस आणि प्रशिक्षण साठी खर्च करू शकण्याची पारिवारिक आर्थिक बाजू नसल्याने जमेल ते कामे करत अभ्यास सुरू ठेवला.गावातच पडक्या इमारतीचा वाचनालय बनवत समविचारी तरूणांसोबत गावातच अभ्यास करणे आणि एकमेकांना मार्गदर्शन व सहकार्य करत शारीरिक चाचणी व लेखी परीक्षेची तयारी करत राहीला आणि अखेर एक दिवस वर्दिचे स्वप्न सत्यात उतरवीले.पोलिस काॅंस्टेबल पदी निवड झाली आणि पुर्ण पोलिस प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर दिनांक – १३ फेब्रुवारी २०२४ ला प्रशिक्षण केंद्र सोलापूर येथे पासींग परेड च्या दिनी आईवडीलांसोबतच्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहुन आधीचे सारे दुःख एका सेकंदात गळून पडल्याचे जानवले; असे तो म्हणाला.आयुष्य परिक्षा घेते..पण परिक्षा,आयुष्यही बदलून देते; हे अनुभवता आले.आपण संघर्ष सातत्य आणि जिद्दीने नक्कीच ध्येय गाठू शकतो; फक्त जवळ कायम हवा तो संयम; हा अनुभव वर्दिचे स्वप्न पाहणाऱ्यासाठी त्यांनी मांडला.न थकता,न हरता, न निराश होता; स्वप्नांच्या दिशेने पाऊल टाकत राहणाऱ्याला यश एक दिवस नक्कीच मीठी मारतो. असे,अनिष आपल्या प्रवासातील अनुभवातून म्हणाला.

