Wednesday, April 15, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज पोलीस प्रशासनाने अवैध सट्टा-पट्टीस केले हद्दपार...

देसाईगंज पोलीस प्रशासनाने अवैध सट्टा-पट्टीस केले हद्दपार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

देसाईगंज :- पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेश मेश्राम व त्यांच्या चमूने तालुक्यात अवैधरित्या चालणाऱ्या सट्टा-पट्टी धारकांवर कारवाईचा बडगा उगरताच सर्वांचे धाबे दणाणून गेले आहेत.सर्वसामान्य जनतेच्या खिशाला लागणारी कात्री थांबून देसाईगंज शहराबरोबरच ग्रामीण भागातील सट्टा-पट्टी पोलीस विभागाने हद्दपार केली असल्याने पोलीस विभागाची सर्वच स्तरातून प्रशंसा केली जात आहे.

गडचिरोली जिल्ह्यात कधी न घडणारी घटना हल्ली पहावयास मिळत आहे.दररोज सट्टा-पट्टीच्या दुकानांसमोर अफाट दिसणारी गर्दी आज दिसेनासी झाली आहे.शहरातील व ग्रामीण भागातील सटोरी गँगचा नायनाट झाल्याचे दिसून येत आहे.काहीजण हळूच डोके वर काढण्याचा प्रयत्न करीत आहेत.मात्र देसाईगंज पोलीस ठाण्याचे ठाणेदार महेश मेश्राम डोके वर काढू पहाणाऱ्यांवर पोलिसी हिसका दाखवून बंद पुकारले आहे. 

देसाईगंज येथे कित्येक वर्षांपासून अवैध सट्टा-पट्टीचा व्यवसाय जोमात व खुलेआम सुरू होता.कित्येकजण लहानांपासून तर थोरांपर्यंत सट्टा-पट्टीच्या आहारी जाऊन सर्वकाही गमावून बसले होते.अनेकांना सट्टा-पट्टीचे व्यसन जडले होते.एकदा व्यसन जडले तर व्यसनातून बाहेर पडणे अशक्य आहे.अशातच देसाईगंज पोलीस प्रशासनाने कंबर कसून सट्टा-पट्टीच्या जडलेल्या व्यसनातून बाहेर काढले असल्याने म्हणतात ना की पोलीस प्रशासनाने मनात आणले तर सर्वकाही शक्य आहे.याचीच खरी प्रचिती हल्ली निदर्शनास येत आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उष्णतेची लाट; उद्याला ‘या’ जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी,प्राथमिक व माध्यमिक शाळा राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-राज्याच्या विविध भागात उन्हाची तीव्रता वाढली आहे.भारतीय हवामान विभागाने आज,बुधवार १५ एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्यास उष्णतेचा 'यलो अलर्ट' जाहीर केला होता.अश्यातच...

उद्याला सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल गडचिरोलीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्याचे वित्त,नियोजन,कृषी,मदत व पुनर्वसन,विधी व न्याय,कामगार राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड.आशिष जयस्वाल हे उद्या,गुरुवार १६ एप्रिल रोजी गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत...

बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकली ठार; आजची घटना..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील परिसरात वाघिणीने धुमाकूळ घालून गुरुवार,१९ मार्च २०२६ रोजी बाम्पेवाडा येथील ५० वर्षीय वसंत गणपत मेश्राम यांचा जीव घेतला...

आता प्रत्येक लाभार्थी कुटुंबास मिळणार तीन लिटर रॉकेल..

उद्रेक न्युज वृत्त :-जमाना कितीही बदलला तरीही 'जुनं ते सोनं' अशी अवस्था केवळ आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र राज्याच्या विविध...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!