Thursday, July 16, 2026
Homeकुरखेडासुगंधित तंबाखू तस्करांनी लढवली शक्कल तरीही अडकले जाळ्यात-कुरखेडा पोलिसांची मोठी कारवाई; २३...

सुगंधित तंबाखू तस्करांनी लढवली शक्कल तरीही अडकले जाळ्यात-कुरखेडा पोलिसांची मोठी कारवाई; २३ लाखाच्यावर मुद्देमाल केला हस्तगत

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त

कुरखेडा(गडचिरोली) :-पोत्यात वर पोहे व खाली सुगंधित तंबाखू टाकून छत्तीसगडहून आलेला टेम्पो कुरखेडा तालुक्यातील गोठणगाव येथे पोलिसांनी पकडला.यावेळी चालकास ताब्यात घेतले असून सुमारे २३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ललितकुमार खेमचंद टंडण वय २५ वर्षे,रा. राजनांदगाव,छत्तीसगड असे आरोपीचे नाव आहे.तो टेम्पोतून सीजी ०८ एके-४२३८ क्रमांक असलेल्या वाहनातून छत्तीसगडहून गडचिरोलीमार्गे चंद्रपूरला जात असल्याची माहिती मिळाल्यावरून एसडीपीओ साहील झरकर यांनी गोठणगाव नाक्यावर सापळा लावला.टेम्पो आल्यावर झडती घेतली असता,त्यातील पोत्यात वर पोहे व खाली सुगंधित तंबाखू आढळून आले.सुमारे ८ लाख ९ हजार २८० रुपयांची तंबाखू, ३ लाख ८५ हजारांचे पोहे,मोबाइल, टेम्पो असा सुमारे २३ लाख ५० हजार ८८० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.चालक ललितकुमार खेमचंद ठंडण २५, रा राजनांदगाव, छत्तीसगड याला अटक करण्यात आली.

याप्रकरणी कुरखेडा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पोलीस उपनिरीक्षक दयानंद भोंबे हे तपास करीत आहेत.दरम्यान,जिल्ह्यातील गांजा, सुगंधित तंबाखू तस्करीचे छत्तीसगड कनेक्शन यापूर्वीही अनेकदा उघडकीस आलेले आहे.मात्र,पाळेमुळे खणून काढण्यात पोलिसांना यश येत नाही. या कारवाईनंतर रॅकेट उघडकीस येणार का, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शेतकऱ्यांना मोठा दिलासा; शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या निकषात सुधारणा..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ च्या निकषात सुधारणा करण्याचा निर्णय मुंबई येथे मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र...

अखेर प्रतीक्षा संपली; लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून मागील महिन्याच्या दीड हजाराची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.जून महिना संपून जुलै...

बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय; कामगारांना मिळणाऱ्या लाभ रकमेत वाढ..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांसाठी मोठा आणि महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. मंडळाच्या चार प्रमुख कल्याणकारी...

अज्ञात वाहनाची बिबट्याला धडक; बिबट्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला एका भरधाव वेगात असलेल्या अज्ञात वाहनाने जोरात धडक दिल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन  बिबट्याचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!