Friday, September 25, 2026
Homeगडचिरोलीवन परिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात-गडचिरोली जिल्ह्यातील घटना…..

वन परिक्षेत्र अधिकारी अडकला एसीबीच्या जाळ्यात-गडचिरोली जिल्ह्यातील घटना…..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

गडचिरोली :- वनक्षेत्रातील रस्त्याच्या कामासाठी अवैधरित्या गौणखनिज वाहतूक करताना जप्त केलेले ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी तसेच दंड कमी करण्यासाठी संबंधित कंत्राटदाराकडून ५ लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी काल,गुरुवारी दिनांक- ४ जानेवारी रोजी रात्री अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद आनंदराव जेनेकर वय ३८ वर्षे यास रंगेहाथ पकडून अटक केली.

एसीबीने दिलेल्या माहितीनुसार,तक्रारकर्त्या कंत्राटदारामार्फत पेरमिली वनपरिक्षेत्रांतर्गत तुमरगुडा ते कासमपल्ली रस्त्याचे काम सुरु होते.या कामासाठी कंत्राटदाराने ट्रॅक्टरद्वारे गौण खनिजाची वाहतूक केली.ही वाहतूक अवैध असल्याचे सांगत वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद जेनेकर याने ट्रॅक्टर पकडून ७२ लाख रुपयांचा दंड ठोठावला.हा दंड कमी करुन जप्त केलेले ट्रॅक्टर सोडून देण्यासाठी जेनेकर याने तक्रारकर्त्यास १० लाख रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती ५ लाख रुपये स्वीकारण्यास तयार झाला.परंतु, लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने कंत्राटदाराने गडचिरोली येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

त्याअनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी रात्री सापळा रचून वनपरिक्षेत्राधिकारी प्रमोद जेनेकर यास तक्रारकर्त्याकडून ५ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडून अटक केली.यावेळी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी जेनेकर याच्या निवासस्थानाची झडती घेऊन ८५ हजारांची रोख रक्कमही जप्त केली.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मुसळधार पावसाचा फटका..! भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद; ६३ गावांचा तुटला संपर्क..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पावसाने हजेरी लावली आहे.अश्यातच जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचे पाणी पुलावरून वाहत असल्याने भामरागड-आलापल्ली मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली...

जुनी वडसा येथे झुडपी जंगलातील वनपट्ट्यांबाबत सभापती सचिन खरकाटे यांचे मोलाचे मार्गदर्शन..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषद हद्दीतील जुनी वडसा येथील झुडपी जंगल परिसरावर वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या आणि शेती कसत असलेल्या नागरिकांना वनजमिनीचे पट्टे मिळवून देण्यासाठी...

शिधापत्रिकाधारकांनी १५ दिवसांत ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना धान्याचा लाभ नियमितपणे मिळावा आणि शिधापत्रिकेवरील सदस्यांची माहिती अचूक व अद्ययावत राहावी,यासाठी गडचिरोली तालुक्यात ई-केवायसी प्रक्रिया...

“आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही; मला माफ करा” अशी चिठ्ठी लिहून वकिलाने घेतला गळफास.

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-एका २५ वर्षीय तरुण वकिलाने गळफास घेण्यापूर्वी एक चिठ्ठी लिहिली.त्यात "आई-बाबा मी तुमची अपेक्षा पूर्ण करू शकलो नाही,मला माफ करा.माझ्या बहिणीकडे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!